Armaan Malik | दोन पत्नी, चार मुलांचा पिता; युट्यूबर अरमान मलिक दर महिन्याला किती कमावतो?

ही कमाई फक्त अरमानच्या युट्यूब चॅनलची आहे. त्याच्या पत्नींच्या युट्यूब पेजेसवरूनही चांगली कमाई होते. त्यामुळे युट्यूबच त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे. युट्यूबशिवाय तो इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनही पैसे कमावतो.

Armaan Malik | दोन पत्नी, चार मुलांचा पिता; युट्यूबर अरमान मलिक दर महिन्याला किती कमावतो?
Armaan MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 2:28 PM

मुंबई : युट्यूबर अरमान मलिकचं खासगी आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याच्या खासगी आयुष्यात जे-जे घडतं ते सर्व तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. दोन मुलींसोबत लग्न केल्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता. पायल आणि कृतिका अशा त्याच्या दोन्ही पत्नींची नावं आहेत. तर चार मुलांचा तो पिता आहे. अरमानसोबतच पायल आणि कृतिकासुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या सर्वांचे वेगवेगळे युट्यूब पेजेस आहेत. या पेजवर ते दररोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करतात. त्यावर लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात.

पत्नी आणि मुलांशिवाय अरमान मलिकची स्वत:ची एक मोठी टीम आहे. या टीमपैकी काही जण व्हिडीओ बनवण्याचं आणि काही जण व्हिडीओ एडिट करण्याचं काम करतात. याशिवाय दररोज नवीन कंटेट तयार करण्याची जबाबदारी अरमानची असते. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तो अनेकदा त्याच्या दोन्ही पत्नींमधील भांडण दाखवतो. या दोघींमधील भांडणाच्या व्हिडीओला तुफान व्ह्यूज मिळतात.

हे सुद्धा वाचा

आता प्रश्न असा आहे की अरमान इतक्या लोकांसोबत राहतो तर त्याची कमाई किती आहे? एका रिपोर्टनुसार युट्यूबर अरमान मलिक 10 ते 15 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. याशिवाय तो दर महिन्याला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. ही कमाई फक्त अरमानच्या युट्यूब चॅनलची आहे. त्याच्या पत्नींच्या युट्यूब पेजेसवरूनही चांगली कमाई होते. त्यामुळे युट्यूबच त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे. युट्यूबशिवाय तो इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनही पैसे कमावतो.

अरमान मलिक त्याच्या पत्नी आणि मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करताना दिसतो. त्यांच्यावर तो मोकळ्या मनाने पैसे खर्च करतो. पायल आणि कृतिका दोघी मिळून व्हिडीओ बनवतात. त्या जिथेही जातात तिथे कॅमेरा सोबत घेऊन जातात. अनेकदा ते व्हिडीओमुळे ट्रोलदेखील होतात. कृतिका आणि पायल या दोघी एकत्र गरोदर झाल्या होत्या. तेव्हासुद्धा अरमान खूप चर्चेत आला होता. पत्नीच्या डिलिव्हरीनंतर नवजात शिशूचा व्हिडीओ अपलोड केल्याने त्याला ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.