कोट्यधीश युट्यूबरने मुलांच्या नॅनीसोबत केलं तिसरं लग्न? दुसऱ्या पत्नीने सोडलं मौन
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकने मुलांच्या नॅनीसोबतच तिसरं लग्न केलं की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर अखेर अरमानच्या दुसऱ्या पत्नीने मौन सोडलं आहे. अरमानने याआधीच दोनदा लग्न केलंय. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नी आहेत.
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अरमानने दोन लग्न केले असून दोन्ही पत्नी आणि मुलाबाळांसोबत एकत्र राहतो. यावरून अनेकदा अरमानला नेटकरी ट्रोल करतात. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नी असून अरमानला चार मुलं आहेत. पत्नी आणि मुलांसोबतचे विविध व्हिडीओ तो त्याच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतो. मुलांच्या देखरेखीसाठी एक नॅनीसुद्धा आहे, जिचं नाव लक्ष्य असं आहे. मुलांच्या नॅनीसोबत अरमान अनेकदा रील्स आणि व्हिडीओ शूट करताना दिसतो. करवाचौथच्या दिवशी लक्ष्यच्या हातावर अरमानच्या नावाची मेहंदी पाहून त्यांच्या लग्नाच्याही चर्चांना उधाण आलं होतं. दोन पत्नी असतानाही अरमान मलिकने नॅनीसोबत तिसरं लग्न केल्याचा दावा अनेकांनी केला. अरमान त्याच्या सोशल मीडिया कंटेंटसाठी नॅनी लक्ष्यचा वापर करत असल्याचीही टीका नेटकऱ्यांकडून झाली होती. या सर्व चर्चांवर आता अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.
अरमानच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर कृतिका म्हणाली, “तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही लक्ष्यचा वापर कंटेंटसाठी करतो, तर असं काहीच नाही. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. ती अरमानची तिसरी पत्नी आहे, असं तुम्हाला वाटतं. पण मी अनेकदा त्याबाबत स्पष्ट केलंय. लक्ष्यनेही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पायल आणि अरमाननेही सांगितलंय की असं काहीच नाही. गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्य आमच्यासोबत आहे. ती आमच्या मुलांचा सांभाळ करते. मुलांचे रील्स ती इन्स्टाग्रामवर शेअर करते.”
View this post on Instagram
“लक्ष्यच्या कुटुंबीयांनाही माहीत आहे की ती आमच्यासोबत राहते. जर एखादी व्यक्ती आमच्या घरात राहत असेल तर त्या व्यक्तीचा वापर आम्ही कंटेंटसाठी करतो, असं अजिबात नाही. लक्ष्य अनेकदा तुम्हाला मुलांच्या व्लॉगमध्ये दिसते. पण तिचं संपूर्ण कामच ते आहे. मुलाबाळांच्या व्लॉग्सचं काम तीच पाहते. त्यामुळे आम्ही तिचा वापर कंटेटसाठी करतो, असं म्हणू नका. आमच्या कुटुंबाचं जे सत्य आहे जेच आम्ही आमच्या व्लॉगमध्ये दाखवतो”, असं कृतिकाने पुढे स्पष्ट केलं.