YouTuber अरमान मलिकची नवीन गर्लफ्रेंड आली समोर; भडकल्या दोघी प्रेग्नंट पत्नी

युट्यूबर संदीप हा इंटरनेट सेन्सेशन आहे, जो स्वत:चं नाव अरमान मलिक आहे असं सांगतो. मात्र हे त्याचं खरं नाव नाही. त्याने जेव्हा आपल्या दोन लग्नांविषयी युट्यूबवर सांगितलं, तेव्हापासून तो रातोरात प्रकाशझोतात आला.

YouTuber अरमान मलिकची नवीन गर्लफ्रेंड आली समोर; भडकल्या दोघी प्रेग्नंट पत्नी
Armaan MalikImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 4:30 PM

हैदराबाद : युट्यूबर अरमान मलिक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अरमानच्या दोन्ही पत्नी गरोदर आहेत. नुकताच कृतिका मलिक आणि पायल मलिक यांचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. अरमानच्या घरात लवकरच दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. यादरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरमान तिसऱ्याच मुलीसोबत दिसत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

या व्हायरल व्हिडीओमध्ये अरमान मलिकची नवीन गर्लफ्रेंड त्याच्याच घरी येऊन तमाशा करताना दिसतेय. एक तरुणी अचानक त्याच्या घरात येते आणि अरमानवर फसवणुकीचा आरोप करते. यावेळी अरमानच्या चेहऱ्यावरील भितीसुद्धा सहज पहायला मिळते.

चार दिवसांपासून अरमान माझा फोन उचलत नाहीये आणि माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीये, असा आरोप ती करते. इतक्यात युट्यूबरच्या दोन्ही पत्नी तिथे येतात. घरात ही नवीन मुलगी कोण आली आहे, असा प्रश्न त्यांना पडतो. अरमानला तिच्याबद्दल दोघी प्रश्न विचारतात. त्यावर ती मुलगी असा दावा करते की गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ती अरमानला डेट करतेय. दोघांची भेट जिममध्ये झाली आणि तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत, असं ती सांगते.

हे सुद्धा वाचा

एकीकडे अरमानची पोलखोल असताना तो मात्र हे सर्व आरोप फेटाळतो आणि त्या मुलीला ओळखण्यास नकार देतो. मात्र जेव्हा ती पुरावे दाखवण्याविषयी बोलते, तेव्हा अरमान गोंधळतो. त्यानंतर त्याच्या दोन्ही पत्नींचा राग अनावर होतो. पायल आणि कृतिका त्याला चांगलंच सुनावतात. जवळपास नऊ महिन्यांच्या या व्हिडीओमध्ये जोरदार बाचाबाची होते. मात्र नंतर अरमान खुलासा करतो की हा व्हिडीओ त्याने चाहत्यांसाठी प्लॅन केला होता. म्हणजेच नऊ मिनिटांपर्यंत सुरू असलेला हा हाय व्होल्टेड ड्रामा फक्त एक प्रँक होता.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.