मुंबई | 22 जुलै 2023 : प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरमान मलिक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अरमान कायम त्याच्या दोन पत्नींसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अरमान त्याच्या दोन पत्नींसोबत एकाच घरात राहत असल्यामुळे देखील अनेक चर्चा रंगल्या. अरमान याला त्याच्या दोन पत्नींमुळे कायम ट्रोल केलं जातं. अशात अरमान पुन्हा एका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. अरमान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरमान त्याच्या दोन पत्नींसोबत नाही तर, नव्या मुलीसोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. अरमान याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्याने युट्यूबरवर पुन्हा निशाणा साधला आहे.
नुकताच, अरमान याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. अरमान व्हिडीओमध्ये जीम रुटीन करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अरमान एका महिलेला वर्कआऊट करण्यासाठी मदत करत आहे. अरमान महिलेला हेवी वेट उचलण्यासाठी मदत करताना दिसत आहे. नव्या महिलेसोबत दिसल्यामुळे अरमान पुन्हा चर्चेत आला आहे.
अरमान जीममध्ये ज्या महिलेसोबत वर्कआऊट करत आहे, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून युट्यूबरची खास मैत्रिण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निष्ठा मिड्डा आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिली अरमान याची खास मैत्रिण आहे. पण नेटकरी मात्र त्यांच्यामध्ये दिसत असलेल्या कमेस्ट्रीमुळे दोघांना ट्रोल करत आहेत.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, ‘तिसऱ्या लग्नासाठी सज्ज असल्याचं दिसून येत आहे…’ अन्य नेटकरी म्हणाला, ‘तिसरी पत्नी आणणार आता…’, तिसरा नेटकरी म्हणाली, ‘तिसरीची तयारी…’ असं म्हणत नेटकरी अरमान मलिक याला ट्रोल करत आहेत. अरमान मलिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अरमान याने पहिलं लग्न पायल तर दुसरं लग्न पायलची मैत्रिण कृतिका हिच्यासोबत केलं आहे. अरमान आणि पायल यांचं २०११ मध्ये लग्न झालं. त्यानंतर त्यांना चिरायू मलिक नावाचा मुलगा झाला. यानंतर अरमान याने २०१८ मध्ये पायलला घटस्फोट न देता कृतिकासोबत लग्न केले. नुकतीच पायल जुळ्या मुलांची आई झाली असून कृतिकानेही एका मुलाला झैदला जन्म दिला आहे.
सोशल मीडियावर देखील अरमान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अरमान कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.