‘पती माझा, कपडे माझे, चल चप्पल काढ’ प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन पत्नींमध्ये कडाक्याचं भांडण, व्हिडीओ व्हायरल

अरमानने दोन लग्न केले असून त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल या एकाच घरात बहिणींसारख्या राहतात. त्यांच्या हॅपी फॅमिलीमागील गुपित जाणून घेण्यासाठी अनेकजण सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात.

'पती माझा, कपडे माझे, चल चप्पल काढ' प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन पत्नींमध्ये कडाक्याचं भांडण, व्हिडीओ व्हायरल
'पती माझा, कपडे माझे, चल चप्पल काढ' प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन पत्नींमध्ये कडाक्याचं भांडणImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 4:36 PM

हैदराबाद: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अरमानने दोन लग्न केले असून त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल या एकाच घरात बहिणींसारख्या राहतात. त्यांच्या हॅपी फॅमिलीमागील गुपित जाणून घेण्यासाठी अनेकजण सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात. मात्र अरमानच्या दोन पत्नींमध्ये नुकतंच कडाक्याचं भांडण झालं. फक्त इतकंच नाही तर त्यांची नवीन गाडीसुद्धा चोरीला गेली. याच घटनांची माहिती देत पहिली पत्नी कृतिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कृतिका मलिकने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हॉटेलच्या एका रुममध्ये पायल आणि कृतिका एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. पायल तिची बॅग भरून घराबाहेर निघत असते आणि कृतिका तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. पायल जेव्हा कृतिकाला बरंवाईट बोलू लागते, तेव्हा कृतिकासुद्धा तिला घराबाहेर जायला सांगते. या व्हिडीओच्या अखेरीस पायलला गेटबाहेर पडावं लागतं.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर दिखावा करण्यासाठीच हा व्हिडीओ शूट केल्याचं समजतंय. कारण नंतर पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये या दोघी पुन्हा एकमेकींशी प्रेमाने वागू लागतात. या व्लॉगमध्ये नवीन गाडी चोरीला गेल्याचीही माहिती कृतिकाने दिली. एका नातेवाईकाच्या लग्नात ते तीन गाड्या घेऊन गेले होते आणि तिथेच एक गाडी चोरीला गेल्याचं तिने सांगितलं.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे.

त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.