Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Armaan Malik Vlog | अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने दिली थेट धमकी, म्हणाली, चप्पल काढून मारेन

यूट्यूबर अरमान मलिक हा नेहमीच चर्चेत असतो. यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या कुटुंबियांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. इतकेच नाही तर यूट्यूबर अरमान मलिक हा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करतो.

Armaan Malik Vlog | अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने दिली थेट धमकी, म्हणाली, चप्पल काढून मारेन
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 4:54 PM

मुंबई : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik Vlog) आणि त्याच्या दोन्ही पत्नी नेहमीच चर्चेत असतात. अरमान मलिक याची बहीण सपना हिने नुकताच अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींवर काही आरोप हे केले आहेत. सपना हिचे हे आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक (Payal Malik) हिने काही दिवसांपूर्वीच दोन जुळ्या बाळांना जन्म दिलाय. एक मुलगा आणि एक मुलगी पायल मलिक हिला झालीये. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक (Kritika Malik) हिने देखील एका मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे यांनी त्यांच्या नवजात बाळांची देखील झलक चाहत्यांना दाखवली आहे.

यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याचा दोन्ही पत्नींची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई मलिक कुटुंबिय करतात. इतकेच नाही तर त्यांची तब्बल 40 जणांची टिम आहे. याचा खुलासा स्वत: पायल मलिक हिने केला आहे. यूट्यूबर अरमान मलिक याचेही गाणे कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

नुकताच पायल आणि कृतिका मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क पायल मलिक ही ढसाढसा रडताना दिसत आहे. इतकेच नाही तर बोलताना थेट पायल मलिक हिने चप्पलने मारण्याची थेट धमकी देखील देऊन टाकली आहे. आता हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.

या व्हिडीओमध्ये पायल मलिक ही म्हणते की, लोक जेंव्हा माझ्याबद्दल कृतिका आणि अरमान जीबद्दल बोलत होते, त्यावेळी आम्ही शांत होतो. आम्ही ते सर्वकाही सहन करत होता. मात्र, आता विषय माझ्या लेकऱ्यांचा येतोय. एक महिन्यांपूर्वी जन्मलेल्या माझ्या तुबाबद्दल काहीही बोलले जात आहे. तिच्या रंगावरून सतत टिका केली जात आहे.

मलिक कुटुंबातील एक बाळ देवाघरी जावे स्पेशली तुबा अशी कमेंट देखील करण्यात आलीये. अरे तुबा अजून एक महिन्यांची देखील झाली नाहीये. तिच्याबद्दल तुम्ही असे का बोलत आहात? मी माझ्याबद्दल बोललेले ऐकून घेऊ शकते, पण माझ्या लेकऱ्यांबद्दल अजिबातच नाही. आता परत जर माझ्या लेकऱ्यांबद्दल बोलतात तर चप्पलने मारेल असेही पायल म्हणाली आहे. या व्हिडीओमध्ये पायल रडताना देखील दिसत आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.