Bollywood Debut | यूट्यूबर कॅरी मिनाटीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करणार!
सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकणारा युट्यूबर कैरी मिनाटी आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.
मुंबई : सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकणारा युट्यूबर कैरी मिनाटी आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. कॅरी मिनाटीचे खरे नाव अजय नागर आहे. बॉलिवूडमध्ये कॅरीची एन्ट्री धमाकेदार ठरणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अजय देवगन आणि अमिताभ बच्चन यांच्यासमवेत विशेष भूमिकेत दिसणार आहेत. (YouTuber Carrie Minati’s entry into Bollywood)
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कॅरी मिनाटीने त्यांच्या बॉलिवूड प्रवेशाबद्दल स्वतः दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की माझा भाऊ आणि दीपक चार यांना अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसचे सह-निर्माता कुमार मंगत पाठक यांचा फोन आला होता. चित्रपटात मी कॅरीचे यूट्यूब पात्र साकारणार आहे. मी खूप खूश आहे कारण मी चित्रपटात कॅरी मिनाटीची भूमिका साकारणार आहे.
बॉलीवूडमध्ये येण्याची कधीच कल्पना नव्हती. मी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी व्हिडिओ बनवत होतो. परंतु मला सर्वकाही अनुभवायचे आहे. मी या चित्रपटाला हो म्हणालो याचे कारण कॅरी मिनाटी या पात्रावर काहीही करणे मला खूप सोपे आहे. मी दररोज या पात्रासह खातो, पितो, झोपतो आणि श्वास घेतो. मला आशा आहे की मी अमिताभ बच्चन आणि अजय देवगन यांच्या अभिनयाबद्दल बरेच काही शिकेल. कॅरीच्या व्हिडिओला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तो पुढे म्हणाला की, मला दररोज थोडे अधिक काम करावे लागेल. मी दररोज 10 तास काम करतो.
‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक योगदान देण्याचं आवाहन केलं होते. सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला होता. अभिनेता अजय देवगन याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली होती.
‘प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड 19 साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असं ट्वीट अजय देवगण याने केलं होते.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणने 25 कोटी 51 लाखांची मदत केली होती. पीएम केअर फंडसाठी 15 कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी रुपयांचे योगदान त्याने दिले होते
अजयने ‘FWICE’ अर्थात फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज’ला 51 लाखांची मदत केली होती. बॉलिवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या, म्हणजेच हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्याने 51 लाखांची रक्कम दिली होती.
संबंधित बातम्या :
Karthik Aryan | यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!
(YouTuber Carrie Minati’s entry into Bollywood)