युजवेंद्र चहलच्या पत्नीचा संताप, धनश्री वर्माने ट्रोलर्सला थेट म्हटले, तुम्हालाही आई, बहीण, वाचा काय घडले?

Dhanashree Verma Video : क्रिकेटर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. धनश्री वर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय असून खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.

युजवेंद्र चहलच्या पत्नीचा संताप, धनश्री वर्माने ट्रोलर्सला थेट म्हटले, तुम्हालाही आई, बहीण, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 3:46 PM

मुंबई : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही कायमच चर्चेत दिसते. धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. धनश्री वर्मा ही धमाकेदार रिल्स देखील तयार करते. नुकताच धनश्री वर्मा ही झलक दिखला जा 11 मध्ये धमाल करताना दिसली. जबरदस्त डान्स धनश्री वर्मा हिने केले. धनश्री वर्मा ही विजेतेपदाची दावेदार होती. धनश्री वर्मा हिला चाहते हे सपोर्ट करताना देखील दिसले. शोच्या शेवटच्या टप्प्यात धनश्री वर्मा ही शोमधून बाहेर पडली. धनश्री वर्मा ही कायमच चर्चेत असते.

नुकताच धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोठा संताप केला. हेच नाही तर ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावताना धनश्री वर्मा ही दिसत आहे. धनश्री वर्मा ही अनेक भारतीय क्रिकेटरसोबत व्हिडीओ तयार करताना दिसलीये. ज्यामुळे तिच्याबद्दल उलटसुलट चर्चा या कायमच ऐकायला मिळतात. मात्र, कधीच त्यावर बोलताना धनश्री वर्मा दिसली नाही.

यावेळी धनश्री वर्मा ही संतापताना दिसत आहे. धनश्री वर्मा हिचा चांगलाच पारा चढल्याचे देखील बघायला मिळाले. धनश्री वर्मा आणि तिचा कोरियोग्राफर प्रतीक उटेकर याचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहेत, हेच नाही तर या फोटोंनंतर खालच्या पातळीवर जाऊन धनश्री वर्मा हिच्यावर जोरदार टीका देखील केली जातंय.

धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मी माझ्या आयुष्यात कधीच ट्रोल आणि टिका करणाऱ्यांवर लक्ष देत नाही. मात्र, यावेळी या गोष्टींचा फरक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पडत आहे. काही गोष्टी या समोर ठेवण्याच्या अगोदर आणि त्यावर मत मांडण्याच्या अगोदर आपण त्या गोष्टी समजून घेणे खूप जास्त आवश्यक ठरते.

सर्वांना सोशल मीडियावर बोलण्याची आजादी आहे. मात्र, तुम्ही विसरता की, तुमचे देखील एक कुटुंब आहे. तुम्ही लोकांनी हे विसरले नाही पाहिजे की, मी एक महिला आहे. तुमची आई, बहीण, मैत्रीण सर्वच महिला आहेत. यामुळे हे खरोखरच योग्य नाहीये. मी एक योद्धा आहे आणि मी कधीच हार मानत नाही. मी यावेळी देखील हार मानणार नाहीये, मी सकारात्मक राहिल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.