‘सुहानीच्या मृत्यूची अफवा…’, अभिनेत्रीच्या निधनानंतर दंगल गर्ल झायरा वसीम हिची मोठी प्रतिक्रिया

Zaira Wasim on Suhani Bhatnagar death : 'दंगल' फेम सुहानी भटनागर हिच्या मृत्यूच्या बातमीवर झायरा वसीम म्हणाली, 'सुहानीच्या मृत्यूची अफवा...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहानी हिच्या निधनाची चर्चा

'सुहानीच्या मृत्यूची अफवा...', अभिनेत्रीच्या निधनानंतर दंगल गर्ल झायरा वसीम हिची मोठी प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 2:01 PM

मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : अभिनेता आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकरालेल्या अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर आमिर खान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं. आता झगमगत्या विश्वाला रामराम ठोकलेल्या झायरा वसीम हिने देखील सुहानी हिच्या निधनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झायरा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

झायरा वसीम इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘सुहानी भटनागर हिच्या निधनाची बातमी कळल्यानंतर दुःख झालं. माझ्या भावना मी शब्दातून व्यक्त करु शकत नाही. या कठीण प्रसंगात सुहानी हिच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करते. तिच्या आई – वडिलांची काय अवस्था असेल… याचा विचार करुनच मन विचलीत होतं.’ अशी पोस्ट झायरा हिने केली आहे.

तर एका मुलाखतीत झायरा म्हणाली, ‘मृत्यू बातमी कळली तेव्हा मला विश्वास बसत नव्हता. कदाचित ही अफवा असती. सर्वकाही खोटं असतं. सुहानी खूप चांगली होती. सुहानी हिच्यासोबत माझ्या अनेक आठवणी आहेत.’ असं म्हणत झायरा हिने देखील सुहानी हिच्या निधनावर दुःख व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा

सुहानी भटनागर हिचं निधन 18 फेब्रुवारी रोजी झालं आहे. सोशल मीडियावर सुहानी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुहानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचं निधन झालं आहे.

रिपोर्टनुसार, दोन महिन्यांपूर्वी सुहानी गंभीर आजाराच्या जाळ्यात अडकली होती. अचानक तिच्या शरीरावर लाल रंगाचे डाग दिसू लागले आणि सुहानी डर्मेटोमायोसिटिस या गंभीर आजाराची शिकार झाली. शरीराच्या अवयवांमध्ये पाणी भरल्याने आणि फुफ्फुस खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहानी हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल…’ असं वक्तव्य खुद्द सुहानी हिने एका मुलाखतीत केलं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानी हिचं निधन झालं आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.