zaira wasim | बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर झायरा वसीमने पहिल्यांदाच शेअर केला फोटो, पाहा तिचा नवा लूक
दंगल गर्ल अभिनेत्री झायरा वसीमने खूप कमी वयात आणि कमी वेळेत आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर तिने आपली ओळख निर्माण केली होती. झायराला तीच्या 'दंगल' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. छोट्याशा काळात या काश्मिरी अभिनेत्रीने रसिकांच्या मनात आपली छाप उमटवली.
मुंबई : दंगल गर्ल अभिनेत्री झायरा वसीमने खूप कमी वयात आणि कमी वेळेत आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर तिने आपली ओळख निर्माण केली होती. झायराला तीच्या ‘दंगल’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. छोट्याशा काळात या काश्मिरी अभिनेत्रीने रसिकांच्या मनात आपली छाप उमटवली.
झायराने शेअर केला फोटो (zaira wasim new photo)
बॉलिवूडला राम राम ठोकल्यानंतर झायराने तिच्या सर्व सोशल मीडियावरून तिचे फोटो काढून टाकले होते. परंतू नुकताच झायराने एक फोटो तिच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये ती एका लोखंडी पुलावर फिरताना दिसतं आहे. या फोटोमध्ये तिने बुरखा घातलेला दिसून येत आहे. ती निसर्गाची मजा घेताना या फोटोत दिसत आहे. परंतू या फोटोमध्ये तिच्या चाहत्यांना तिचा चेहरा मात्र दिसत नाही आहे. झायरा कॅमेराकडे पाठ करून निसर्गाच्या सौंदर्यची मजा घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
नक्की काय आहे फोटोमध्ये
या फोटोला तिने ”द वॉर्म ऑक्टोबर सन ” असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. झायराने पोस्ट केलेल्या या फोटोला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस केला आहे तर अनेक जणांनी तिच्या या फोटोला कॉमेंट्ससुद्धा केल्या आहेत. या फोटोनंतर तिचे चाहते तिचा चेहरा बघण्यासाठी उत्सुक झाले आहे.
6 पानी चिठ्ठी लिहुन ठेकला होता बॉलिवूडला राम राम
झायरा वसीमने तिच्या सोशल मीडियावर 6 पानी चिठ्ठी लिहून बॉलिवूडला राम राम ठोकला होता. “बॉलिवूडमध्ये मला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. मी पाच वर्षापूर्वी घेतलेल्या माझ्या निर्णयामुळे माझे पूर्ण आयुष्य बदलले. मला यामध्ये प्रसिद्धी आणि लोकांचे प्रेम मिळाले. पण मला हे नको होते. मी येथे फिट होत आहे पण मी इथली नाही”,असं झायरा आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.झायराने सोशल मीडियावर 6 पानांची चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये तिने कुरानाचाही उल्लेख केला आहे. हा मार्ग मला अल्लाहपासून लांब करत आहे, असंही झायराने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इतर बातम्या