Zara Hatke Zara Bachke | विकी – साराची जोडी ठरतेय हिट; ‘जरा हटके जरा बचके’च्या कमाईत चांगली वाढ
विकी आणि साराच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. लक्ष्मण यांनी याआधी लुका छुपी आणि मिमी यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील गाणी प्रदर्शनापूर्वीच हिट झाली. सोशल मीडियावर या गाण्यावरून लाखो रिल्स बनवले जात आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठीक-ठाक कमाई केल्यानंतर आता दुसऱ्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.49 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 7 ते 7.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. रविवारपर्यंत ‘बाय वन गेट वन’ तिकिटाचीही ऑफर देण्यात आली आहे. मात्र सोमवारपासून बॉक्स ऑफिसवर खरी परीक्षा सुरू होणार आहे.
‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर वर्स’ या ॲनिमिटेड हॉलिवूड सुपरहिरो चित्रपटाची टक्कर आहे. या हॉलिवूड चित्रपटाची भारतात फार क्रेझ आहे. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्राधान्य देणार, हेसुद्धा बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. स्पायडर मॅन या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत जवळपास 8.20 कोटी रुपयांची कमाई करेली. तर तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 7 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. दुसरीकडे अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपटसुद्धा अद्याप थिएटरमध्ये आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट गेल्या महिनाभरापासून थिएटरमध्ये असून अजूनही प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
#OneWordReview…#ZaraHatkeZaraBachke: ENTERTAINING. Rating: ⭐️⭐️⭐️½ This one is desi at heart, could spring a surprise at the #BO… Could be lapped up by families due to its strong message towards the final moments.#ZHZB brings back memories of #Rajshri’s #PiyaKaGhar [1972;… pic.twitter.com/pqwMZhEbMP
— taran adarsh (@taran_adarsh) June 2, 2023
‘जरा हटके जरा बचके’ हा विकी कौशलचा सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. याआधी त्याच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तर सारा अली खानचा हा चौथा सर्वाधिक ओपनिंग कमाईचा चित्रपट आहे. याआधी तिच्या सिम्बा, लव्ह आज कल आणि केदारनाथ या चित्रपटांनी पहिल्या दिवशी दमदार कमाई केली होती.
विकी आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. लक्ष्मण यांनी याआधी लुका छुपी आणि मिमी यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात इंदौरमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. कपिल आणि सौम्या अशा भूमिका विकी आणि साराने साकारल्या असून त्यांची लव्ह-स्टोरी, घटस्फोटापर्यंतचा प्रवास यावर कथा आधारित आहे. यामध्ये शारीब हाश्मी आणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.