झरीन खानने सेलिब्रिटींवर केलेत गंभीर अरोप; म्हणाली, ‘ते रात्रभर बीअर पित होते आणि मी…’
Bollywood Actress Zareen Khan | 'ते रात्रभर बीअर पित होते आणि मी...', बॉलिवूडमध्ये काम करत असताना झरीन खान हिच्यावर आलेली वाईट वेळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा... बॉलिवूडमध्ये आलेल्या वाईट अनुभवांबद्दल अभिनेत्री म्हणाली, निर्मात्यांनी मर्यादा ओलांडल्या
अभिनेता सलमान खान याच्या ‘वीर’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री झरीन खान सध्या तुफान चर्चेत आहे. अभिनेत्रीने काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे. ‘वीर’ सिनेमानंतर देखील अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये झळकली, पण काही सिनेमांमध्ये दिलेल्या बोल्ड आणि हॉट सीनमुळे अभिनेत्रीला ट्रोलींगचा देखील सामना करावाला लागला. एवढंच नाहीतर, अभिनेत्री एका मुलाखतीत ‘अक्सर 2’ सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आणि नंतर देखील अभिनेत्रीसोबत गैरवर्तन करण्यात आलं. अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमात काही बोल्ड सीन नसतील असं मला सांगण्यात आलं होतं. पण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अनेक सीनमध्ये बदल करण्यात आले.’ रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, निर्मात्यांनी छोटे कपडे घालण्यासाठी प्रवृत्त केलं. शिवाय किसिंग सीनमध्ये देखील वाढ करण्यात आली.
झरीन म्हणाली, ‘सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान मला एका ठिकाणी बोलवण्यात आलं आणि सांगितलं जास्त काहीही नाही तुला फक्त त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. पण तिथे असं काहीही झालं नाही. तिकडे निर्माते त्यांची पार्टी करण्यात, बीअर पिण्यात व्यस्त होते…’
‘मी रात्रभर तिकडे बसून होती. पण कोणीही मला भेटण्यासाठी आलं नाही. प्रत्येक जण त्यांच्या पार्टीमध्ये व्यस्त होते. अशात मी तेथून निघण्याचा विचार केला. मी निघाली देखील पण जेव्ही मी निघाली तेव्हा मला थांबवण्यात आलं आणि माझ्याकडून कारची चावी देखील खेचून घेण्यात आली…’ असं म्हणत झरीन हिने अक्सर सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले.
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘अक्सर 2’ सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं होतं. तर सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला होता.
झरीन हिने ‘अक्सर 2’, ‘हेट स्टोरी 4’, ‘1921’, ‘वजह तुम हो’, ‘हेट स्टोरी 3’, ‘हाउसफुल 3’ आणि ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. सलमान खान याच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर देखील झरीन स्वतःची भक्कम ओळख निर्माण करु शकली नाही.