AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान ते सारा, ‘देवमाणूस’ मालिकेतील मायराचे सुपरस्टार कनेक्शन, मिमीचार्वी खडसेचा अनोखा अंदाज

मिमी चार्वी खडसे हिचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास सत्तर हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत. (Dev Manus Maira MimiCharvi Khadse )

सलमान ते सारा, 'देवमाणूस' मालिकेतील मायराचे सुपरस्टार कनेक्शन, मिमीचार्वी खडसेचा अनोखा अंदाज
देवमाणूस मालिकेत मायराची भूमिका साकारणारी मिमीचार्वी खडसे
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 4:09 PM

मुंबई : ‘देवमाणूस’ (Dev Manus) या झी मराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गावातील गोरगरीबांची फसवणूक करणारा भुरटा डॉक्टर अजितकुमार देव यालाही प्रेक्षकांकडून पसंतीची मोहोर मिळाली आहे. तशीच गावातील खुनांचा शोध घेण्यासाठी आलेली एसीपी दिव्या सिंहही वाहवा मिळवत आहे. मालिकेतील डिम्पी, टोण्या, मंगल, बाबू, सरु आजी, बज्या, नाम्या यासारखी पात्रही लोकप्रिय होत असतानाच एक चेहरा लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे मायरा. एसीपी दिव्या सिंहच्या मुलीची अर्थात मायराची भूमिका बालकलाकार मिमी चार्वी खडसे (Mimi Charvi Khadse) साकारत आहे. (Zee Marathi Serial Dev Manus Fame Maira Child Actress MimiCharvi Khadse worked with Salman Khan Sara Ali Khan)

बॉलिवूड कलाकारांसोबत काम

एसीपी दिव्या सिंहची भूमिका साकारणाऱ्या नेहा खानवर (Neha Khan) जसा कौतुकाचा वर्षावर होत आहे, तसंच पाच वर्षांच्या चिमुकल्या मिमी चार्वी खडसे हिनेही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मिमीचार्वी ही लोकप्रिय बालकलाकार – मॉडेल आहे. तिने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान, युवा अभिनेता वरुण धवन, दिलजीत दोसांज, अभिनेत्री सारा अली खान यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केलं आहे.

मंगल आणि टोण्यासोबत डान्स

मिमी चार्वी खडसे हिचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास सत्तर हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत. मिमीने आपल्या सोशल मीडिया अकाऊण्टवर आपली फोटोशूट, रॅम्पवॉक यांचे फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत. देवमाणूस मालिकेच्या सेटवरील ऑफस्क्रीन धमाल करतानाचे फोटो, व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. नुकताच तिने मंगल आणि टोण्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

(Zee Marathi Serial Dev Manus Fame Maira Child Actress MimiCharvi Khadse worked with Salman Khan Sara Ali Khan)

देवमाणूस मालिकेत मिमी साकारत असलेल्या मायराच्या पात्रावर प्रेक्षकांनी अतोनात प्रेम केलं आहे. मायराची आगळी वेगळी हेअरस्टाईल आणि तिची बोलण्याची लाडिक पद्धत प्रेक्षकांना आवडली आहे. मायरा गावात आल्यानंतर तिला डॉक्टर अजितकुमार देव अर्थात डॉक्टर अंकलची भुरळ पडते. त्याच्यासोबत खेळण्यासाठी तिला वारंवार वाड्यात जावंसं वाटतं. अगदी दिव्याला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं, तेव्हाही मायरा आपला सांभाळ करण्यासाठी डॉक्टर अंकललाच सोबत येण्याची विनंती करते. मायरा त्याला पप्पा अशीही हाक मारताना मालिकेत दाखवलं आहे. आता पुढे मालिकेत कोणती वळणं येणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

आई मराठी, मुस्लीम वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी, ‘देवमाणूस’फेम नेहा खानची संघर्षगाथा

अभिमन्यूला सोडून लतिका-दौलतची जमली जोडी, लाडक्या ‘सुंदरा’चा ‘वाथी कमिंग’ धमाल डान्स पाहिलात का?

(Zee Marathi Serial Dev Manus Fame Maira Child Actress MimiCharvi Khadse worked with Salman Khan Sara Ali Khan)

काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.