Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tu Tevha Tashi: गाणं असावं तर असं.. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या शीर्षकगीताची चर्चा

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय.

Tu Tevha Tashi: गाणं असावं तर असं.. 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या शीर्षकगीताची चर्चा
Tu Tevha TashiImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:25 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय. सौरभ, अनामिका या प्रमुख व्यक्तिरेखांप्रमाणेच  पुष्पावल्ली, चंद्रलेखा, चंदू चिमणे या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मालिकेसोबतच मालिकेच्या शीर्षकगीताची (Title Song) देखील चर्चा आहे. हे गीत रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर रुळतंय. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षकगीत यशस्वी होण्यामागे पडद्यामागील सर्व तत्रंज्ञाचादेखील तितकाच महत्वपूर्ण वाटा असल्याचं समीर सप्तीसकर यांनी आवर्जून सांगितलं.

या शीर्षकगीताबद्दल बोलताना समीर म्हणाला, “एखादी धून रचण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. तसंच या शीर्षकगीताची संकल्पना जवळपास चार महिन्यांपूर्वी ठरली होती आणि पहिल्यांदाच एखाद्या गीताच्या चालीवर मी चार महिने काम केलंय. मी अभिषेकला शीर्षक गीताची धून पाठवायचो आणि त्यावरून तो ते शब्दबद्ध करायचा, अशा पद्धतीने फक्त फोनवरून संवाद साधून हे शीर्षकगीत तयार केलं. पुढे अवघ्या काही दिवसांतच या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांना हे शीर्षकगीत प्रचंड आवडलं आणि प्रेक्षकांना देखील ते आवडतंय याचा खूपच आनंद आहे.”

मालिकेचा प्रोमो-

20 मार्चपासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय. या मालिकेबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, “जळपास 7-8 वर्षांनंतर मेनस्ट्रीम टेलिव्हिजन करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या मालिकेत माझ्या वयाची भूमिका साकारतोय. मी 44 वर्षांचा आहे आणि या वयोगटातली ही प्रेमकथा आहे. खूप वेगळी आणि आजची गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी आजवर पाहिली नाही आहे. मी आणि शिल्पा बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करतोय तसेच आम्ही मंदारसोबत देखील पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे ही मालिका त्यातील व्यक्तिरेखा हे सगळंच खूप फ्रेश आहे.”

हेही वाचा:

Asawari Joshi: “राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन”; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशींचं विधान

Priya Bapat: ‘आता काय ऐकत नाय आपन’; प्रिया बापटच्या फोटोशूटवरील जितेंद्र जोशीच्या कमेंटने वेधलं लक्ष

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.