ZNMD | देशात टोमॅटोचे दर गगनाला; 12 वर्षांपूर्वी हृतिक-कतरिनाने खेळली होती तब्बल 16 टन टोमॅटोंची होळी

2011 मध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान निर्माते रितेश सिधवानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "टोमॅटिना फेस्टिव्हल रिक्रिएट करण्यासाठी आम्हाला पोर्तुगालमधून सुमारे 16 टन टोमॅटो मागवावे लागले होते. कारण स्पेनमधील टोमॅटो त्यावेळी तेवढे पिकलेले नव्हते."

ZNMD | देशात टोमॅटोचे दर गगनाला; 12 वर्षांपूर्वी हृतिक-कतरिनाने खेळली होती तब्बल 16 टन टोमॅटोंची होळी
Zindagi Na Milegi DobaraImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 9:25 AM

मुंबई : झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला नुकतीच 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्की कोचलीन या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. तीन बॅचलर मित्रांची रोड ट्रिप आणि त्यादरम्यान घडणाऱ्या काही मजेशीर काही भावनिक गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि आजही अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा आवर्जून समावेश असतो. स्पेनमधील जवळपास 107 लोकेशन्सवर या चित्रपटातील विविध सीन्स शूट करण्यात आले होते. विशेष म्हणजे यातील एका गाण्यात दाखवण्यात आलेला ‘टोमॅटिना फेस्टिव्हल’ चांगलाच चर्चेत होता.

वापरले 16 टन टोमॅटो

सध्या भारतात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत टोमॅटोची खरेदी करताना दहा वेळा विचार करत आहेत. मात्र ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी 16 टन टोमॅटो वापरण्यात आले होते. गाण्यात तिथला प्रसिद्ध टोमॅटिना फेस्टिव्हल दाखवण्यासाठी पोर्तुगालमधून 16 टन टोमॅटो मागवण्यात आले होते. कारण स्थानिक स्पॅनिश टोमॅटो त्यावेळी पुरेसे पिकलेले नव्हते. या 16 टन टोमॅटोची किंमत जवळपास एक कोटी रुपये इतकी होती.

पोर्तुगालमधून मागवावे लागले टोमॅटो

2011 मध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान निर्माते रितेश सिधवानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, “टोमॅटिना फेस्टिव्हल रिक्रिएट करण्यासाठी आम्हाला पोर्तुगालमधून सुमारे 16 टन टोमॅटो मागवावे लागले होते. कारण स्पेनमधील टोमॅटो त्यावेळी तेवढे पिकलेले नव्हते.”

हे सुद्धा वाचा

शूटिंगसाठी शहर केलं बंद

याविषयी दिग्दर्शिका झोया अख्तर म्हणाली होती, “स्पेनमधील टोमॅटिना हा आपल्या होळी उत्सवासारखाच असतो. पण ते टोमॅटोसोबत खेळतात आणि त्या दिवसापुरता स्पेनचे रस्ते पूर्ण लाल होतात. आम्हाला ते गाणं शूट करताना खूप मजा आली पण तितकंच ते सर्व त्रासदायक होतं. ज्याठिकाणी टोमॅटिना फेस्टिव्हल पार पडतो, त्याच ठिकाणी आम्ही शूटिंग केलं होतं. त्यासाठी आम्हाला संपूर्ण बुन्यॉल शहर बंद करावं लागलं होतं. बुन्यॉलचे रहिवासी खूप समजूतदार होते. त्यांनी आमच्यासोबत टोमॅटिना फेस्टिव्हल दोन वेळा साजरा केला. एकदा स्पेनसाठी आणि एकदा भारतासाठी.”

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.