Video : चरणस्पर्श करताच गणराय थेट उभे राहून आशीर्वाद देतात, सोशल मीडियात देखाव्याची तुफ्फान चर्चा
सातारा : गणरायाचे आशीर्वाद असल्यावर यश हे मिळतेच. त्यामुळे काम कोणतेही असो त्याची सुरवात ही (Ganesh Utsav) गणरायाच्या आशीर्वादनाचे केला जाते. पण दर्शन घेताच तुम्हाला जर गणरायाने उभे राहून आशीर्वाद दिले तर…सर्वकाही सार्थक झाल्यासारखेच होईल…आहो होईल नाही तसे झाले आहे. गणरायाचे (foot touch) चरणस्पर्श करताच गणराय थेट उभे राहून (Blessings) आशीर्वाद देतात. हा व्हिडीओ सातारा […]
सातारा : गणरायाचे आशीर्वाद असल्यावर यश हे मिळतेच. त्यामुळे काम कोणतेही असो त्याची सुरवात ही (Ganesh Utsav) गणरायाच्या आशीर्वादनाचे केला जाते. पण दर्शन घेताच तुम्हाला जर गणरायाने उभे राहून आशीर्वाद दिले तर…सर्वकाही सार्थक झाल्यासारखेच होईल…आहो होईल नाही तसे झाले आहे. गणरायाचे (foot touch) चरणस्पर्श करताच गणराय थेट उभे राहून (Blessings) आशीर्वाद देतात. हा व्हिडीओ सातारा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेस मूर्तीचे दर्शन घेताच गणराय हे थेट उभेच राहतात. गणरायाचे आगमन होण्यापूर्वीच हा व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल होत आहे.
नेमके काय आहे व्हिडीओमध्ये..!
40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जीवनाचे सार्थक झाले असाच काहीसा फील आहे. एक गणेश भक्त येतो काय आणि गणरायाचे चरणस्पर्श करुन दर्शन घेणार तेवढ्यात 10 ते 12 फुट असलेले गणराय हे जागेचे उठून त्या भक्ताला आशीर्वाद देतात. उजव्या हाताने गणराय हे आशीर्वाद देतात. शिवाय त्या गणेश भक्तालाही कोणतेही आश्चर्य वाटले नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 40 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Video : Satara | गणपतीच्या मूर्तीला हात लावताच गणपती बाप्पा उभा राहून आर्शिवाद देतो#GaneshChaturthi2022 #satara pic.twitter.com/JWIdh0PWSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2022
गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी
बुधवारी गणरायाचे आगमन होत आहे. त्याअनुशंगाने राज्यभर तयारी सुरु असून यंदाचा उत्साह काही वेगळाच असणार आहे. कारण गेली दोन वर्ष या उत्सवावर कोरोनाचे सावट होते. शिवाय यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य सरकारनेही सर्व मोकळीक दिली असून गणेश भक्तांचा उत्साह वाढला आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे.
प्रमुख शहरांमध्ये तयारी पूर्ण
दोन वर्षानंतर गणरायाचे आगमन दणक्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच गणेशभक्तांनी तयारी सुरु केली आहे. यंदाच्या वर्षी देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यापूर्वीच गणेश मंडळांनी स्पष्ट केले आहे. हे सर्व असतानाच एका गणेश भक्ताला दर्शनानंतर गणराय हे थेट उभे राहून दर्शन देत असलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.