श्रावण सोमवार झाले सुरू, उपवासाच्या पदार्थांचे भाव माहीत आहे का?
सध्या अधिक मासासह श्रावण महिना सुरू आहे. या कालावधीत अनेक नागरिक उपवास करत असल्याने उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढलीय.
नाशिक : श्रावण महिन्यात वातावरणात बदल होतो. त्यामुळे पचनाशी संबंधित तक्रारी वाढतात. त्यामुळे हिंदू धर्मात व्रत, वैकल्य केले जातात. यामागील कारणही वैज्ञानिक आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. बहुतेक जण श्रावण सोमवारी उपवास करतात. याचे कारण त्यांच्या पोटाचे विकार होऊ नयेत, हे वैज्ञानिक कारण आहे. याला धार्मिकतेची जोड देण्यात आली आहे. बहुतेक सण, वार याच महिन्यात येतात. निसर्गात रम्य वातावरण असते. श्रावण सोमवारी बहुतेक जण उपवास करत असल्याने उपवासासाठी हलकेपुटले अन्नपदार्थ खाता येतात. फलाहार करता येतो. शिवाय भगर, राजगीरा, साबुदाना, शेंगदाणा, शिंगाळे, केळी असे पदार्थ उपवास करणाऱ्या व्यक्तीला खाता येतात. भगर, राजगीरा हे पौष्टिक पदार्थ आहेत. त्यामुळे जे पदार्थ खाल्ले जातात, त्यांना या महिन्यात मागणी जास्त असते. परिणाम भावात थोडाफार फरक पडतो.
असे आहेत शेंगदाण्याचे भाव
सध्या अधिक मासासह श्रावण महिना सुरू आहे. या कालावधीत अनेक नागरिक उपवास करत असल्याने उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढलीय. यातच उपवासाच्या पदार्थांच्या किंमतीत देखील वाढ झालीय. शेंगदाणा महिनाभरातच 40 रुपयांनी महागला असून, 170 रुपये प्रतिकिलो झाला आहे. उपवासाच्या जवळपास सर्वच पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो.
राजगिरा प्रतिकिलो १८० रुपये किलो
मागणीच्या तुलनेत शेंगदाण्याची आवक घटल्याने दर वाढले आहे. राजगिरादेखील प्रतिकिलो 40 रुपयांनी महागला असून, 180 रुपये झालाय. तर साबुदाणा प्रतिकिलो 20 रुपयांनी महागला असून, 90 रुपये दर सुरू आहे.
शेंगदाणा, राजगीरा आणि साबुदाण्याच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतील. शेतकऱ्याला अन्य वेळी पडत्या भावात आपले उत्पादन विकावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याचा बरेचदा उत्पादन खर्चही निघेनासा होतो. यानिमित्ताने शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे जास्त जातील. पण, अन्नदाता हा शेवटी अन्नदाता असतो, हे विसरून चालणार नाही. कारण तो जगाचा पोशिंदा आहे.