Navratri 2023 : नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत? हे नियम पाळणे आहे आवश्यक

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Navratri 2023 : नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत?  हे नियम पाळणे आहे आवश्यक
अखंड ज्योत Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 6:16 PM

मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस अखंड ज्योती पेटवली जाते. नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांत अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री 23 ऑक्टोबरला संपणार असून 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. त्याच्या दूसऱ्या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या वर्षी नवरात्रीच्या काळात  दुर्गा देवीचे हत्तीवर बसून आगमन होत आहे, जे अत्यंत शुभ आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योती का लावली जाते.

अखंड ज्योत लावण्यामागचे कारण

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते. दिवा विझू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसेच, वाऱ्याने दिवा विझू नये, यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते.

हे सुद्धा वाचा

अखंड ज्योतीचे नियम

  • नवरात्रीत अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा चुका केल्यास केल्यास देवी नाराज होऊ शकते.
  •  नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे, त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते. अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका.
  • अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका, ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरा.
  • पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा. जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा.
  • अखंड ज्योती दिव्यात पांठऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी.
  • तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे.
  • अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे, तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची,  दुर्गा देवीची पूजा करावी. दुर्गा मंत्राचा जप करावा. मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...