Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2021: नैवेद्यासाठी हे पक्वान्न केलंय कधी? शरीराला ऊर्जा अन् जिव्हेला तृप्ती देणारा मनगणं पदार्थ!

लहान मुलांसाठी आपल्याकडे पुरणपोळी किंवा चणाडाळीचे पदार्थ अत्यंत पौष्टिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे पुरणाप्रमाणेच मनगणं किंवा दाल पायसम् हा पदार्थदेखील पौष्टिक आहे. चणा डाळ किंवा हरभरा डाळीत बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.

Ganesh Chaturthi 2021: नैवेद्यासाठी हे पक्वान्न केलंय कधी? शरीराला ऊर्जा अन् जिव्हेला तृप्ती देणारा मनगणं पदार्थ!
मालवण, गोवा, कारवार भागात नैवेद्यासाठी आवर्जून केला जाणारा पदार्थ- मनगणं
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 5:21 PM

औरंगाबाद: गणेशोत्सवात बाप्पाला विविध पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, पंचखाद्य, पुरणाचे मोदस, खव्याचे मोदक, शिरा, गुलाब जामून, जिलबी, इम्रती आदी प्रकारचे अनेक नैवेद्य (Ganpati special Bhog recipe) तुम्ही केले असतील. महालक्ष्मीच्या सणात गणपतीला नुकतीच पुरणपोळीचाही नैवेद्य करून झाला असेल. आता पुढचे काही दिवस आपल्या लाडक्या गणेशासाठी कोणता नैवेद्य करायचा, या विचारात तुम्ही असाल तर तुम्हाला एका खास पदार्थाचा ओळख इथे आम्ही करून देत आहोत. अत्यंत पौष्टिक आणि चवीला अफलातून असलेला पदार्थ म्हणजे मनगणं.. पाहुयात कसा करतात हा पदार्थ –

काय आहे मनगणं पदार्थ?

मनगणं हा पदार्थ आपल्याकडे फारसा प्रचलित नाही. मात्र अस्सल खवैय्यांनी या पदार्थाची चवही चाखली असेल आणि तो नैवेद्यासाठी केलाही असेल. मनगणं हा पदार्थ कोकण किनारपट्टीचा भाग, मालवण, गोवा, कारवार आणि दक्षिण भारतातील बहुतांश भागात केला जातो. दक्षिणेकडील भागात याला मनगणं ऐवजी दाल पायसम् असेही म्हणतात. दक्षिण भारतात देवी-देवतांचे पूजन अत्यंत पुरातन परंपरांनुसार करतात. त्याच भागात देवतांच्या पूजनाला आवर्जून दाल पायसम् हा पदार्थ केला जातो. नावावरून आपल्याला लक्षात येते की, हा एका खिरीचा प्रकार आहे. पण ही साधी खीर नसून एकदम पौष्टिक आणि चवीला अफलातून लागणारी आहे. त्यामुळे नैवेद्यासाठीचे हे पायसम् करुन पहायला हरकत नाही.

‘मनगणं’ साठी लागणारे साहित्य

मनगणं तयार करण्यासाठी एक वाटी भिजवलेली चना डाळ, अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, एक वाटी गूळ, मिक्स सुकामेवा, काजू-बदाम-मनुके, अर्धा चमचा वेलची, पाव चमचा जायफळ, साजूक तूप, थोडे पाणी आणि नारळाचे दूध असे साहित्य लागते.

‘मनगणं’ किंवा ‘दाल पायसम्’ची कृती

अगदी दाक्षिणात्य पद्धतीने हा पदार्थ करायचा असेल तर त्याची कृती पुढील प्रमाणे आहे. कढईत तूप गरम करून काजू, बदाम, मनूका आदी सुकामेवा खरपूस रंगावर परतून घ्यावा. सुकामेवा परतल्यावर तो एका ताटात काढून घ्यावा. नंतर कढईत चणा डाळ, साबुदाणा घालावा. त्यात थोडेसे पाणी घालून हे दोन्हींचे मिश्रण शिजवून घ्यावे. हे शिजल्यानंतर त्यात गुळ आणि नारळाचे दूध घालावे. वेलची आणि जायफळाविना पायस होणे अशक्य आहे. त्यामुळे या पायसम् मध्येही मस्त चव येण्याकरिता थोडी वेलची आणि जायफळाची पूड घालावी. संपूर्ण मिश्रण सरसरीत होऊन त्यावर छानशी चमक येईपर्यंत शिजवावे. हे मिश्रण खिरीसारखे मध्यम दाटसर असावे. संपूर्ण शिजल्यानंतर वाटीत काढून ड्रायफ्रूट घालून त्याला सजवावे. तसेच गरम तूप घालून खायला द्यावे. बाप्पाला किंवा कोणत्याही देवतेला नैवेद्य दायखवायचा असेल हा पदार्थ अवश्य करुन पहायलाच हवा.

शरीरासाठी अत्यंत पौष्टिक

लहान मुलांसाठी आपल्याकडे पुरणपोळी किंवा चणाडाळीचे पदार्थ अत्यंत पौष्टिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे पुरणाप्रमाणेच मनगणं किंवा दाल पायसम् हा पदार्थदेखील पौष्टिक आहे. चणा डाळ किंवा हरभरा डाळीत बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्व विपुल प्रमाणात असते. हे जीवनसत्व शरीराला सक्रिय करून ऊर्जावान बनवते. यात अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हृदयासाठीदेखील ही डाळ चांगली असते. हरभरा डाळीचे पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी राहून शरीरावरील सूज कमी करण्यासही मदत होते. तसेच साबुदाणा, सुकामेवा, गूळ, वेलची आणि जायफळ हे सर्व पौष्टिकतेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे घटक यात असल्यामुळे मनगणं किंवा दालपायसम् या पदार्थाची पौष्टिकता वाढते. त्यामुळे आपल्या इष्ट देवतेचे मनोभावे पूजन करते वेळी हा नवा पदार्थ नैवेद्य म्हणून करायला हरकत नाही.

इतर बातम्या-

Ganesh Chaturthi 2021 : खास गणेशोत्सवासाठी घरी नारळ आणि गुळापासून बनवलेले मोदक तयार करा, पाहा रेसिपी!

राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...