शाहीन बागेत पुन्हा हवेत गोळीबार, तरुणाला अटक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शाहीन बागेत आंदोलन सुरु आहे. मात्र, हे आंदोलन थांबावं यासाठी एका तरुणाकडून आज हवेत गोळीबार करण्यात आला (Man fired bullets in shaheen bagh).

शाहीन बागेत पुन्हा हवेत गोळीबार, तरुणाला अटक
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 7:28 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या जामियानगरमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आज (1 फेब्रुवारी) दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात तरुणाने हवेत गोळाबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Man fired bullets in shaheen bagh). गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपी माध्यमांसमोर आला. “आता फक्त हिंदूंचं चालणार”, असं तो माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाला.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शाहीन बागेत आंदोलन सुरु आहे. मात्र, हे आंदोलन थांबावं यासाठी एका तरुणाकडून आज हवेत गोळीबार करण्यात आला (Man fired bullets in shaheen bagh). सुदैवान यात कुणी जखमी झालं नाही. गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव कपिल गुर्जर आहे. तो दिल्ली पूर्वच्या दल्तूपुरा येथे वास्तव्यास आहे.

आरोपी कपिल हा शाहीन बागेत रिक्षातून आला. सर्वात अगोदर तो एका चहाच्या दुकानात बसला. त्यानंतर शाहीन बागेत गेला आणि हवेत गोळीबार करु लागला. गोळीबार केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पकडला गेला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

याअगोदरही अशाच प्रकारची घटना 30 जानेवारी रोजी दिल्लीच्या जामियानगर येथे घडली आहे. या घटनेचे देशभरात पडसाद पडले होते. या घटनेचं देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आलं होतं. आरोपीने अशाप्रकारचं कृत्य करण्याअगोदर फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यामध्ये त्याने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना गोळ्या झाडू, अशाप्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याने जामियानगरमध्ये जावून आंदोलकांवर गोळीबार केला होता. यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.