बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपने अधिकृतरित्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. (BJP Declared Devendra Fadanvis Incharge Of Bihar Election)

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 6:36 PM

पाटणाबिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपने नवी जबाबदारी टाकली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. (BJP Declared Devendra Fadanvis Incharge Of Bihar Election)

बिहार निवडणूक तारखांची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांनाही वेग आला आहे. भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस तसंच बी.एल.संतोष यांच्यासोबत बिहारच्या प्रमुख भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांना अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नेमण्यात आलं.

प्रभारीपदी नियुक्ती होताच बिहार जिंकण्याचा फडणवीसांचा इरादा

देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं म्हणत यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल”, असा दावा फडणवीस यांनी केला.

लवकरच युतीची घोषणा, भूपेंद्र यादवांची माहिती

बैठक संपताच वरिष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी पुन्हा एकदा एनडीए बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसंच “नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारची जनता एनडीएसोबत आहे. यापुढचे दोन-तीन दिवस आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. लवकरच युतीची घोषणा केली जाईल”, असं भूपेंद्र यादव यांनी सांगितलं.

“भाजप, जेडीयू आणि एलजेपी मिळून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. यावेळेस जीतनराम मांझी यांचा पक्ष देखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमची ताकद निश्चित वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणूक एनडीए नक्कीच बहुमताने जिंकेल”, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.

(BJP Declared Devendra Fadanvis Incharge Of Bihar Election)

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूक प्रभारी, नवी दिल्लीत भूपेंद्र यादवांची घोषणा

Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक

MIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण, बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

बिहारमध्ये कोरोना संपला का?; राऊतांचा भाजपला सवाल

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.