काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मानणाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाचा अर्थ समजून घ्यावा. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 7:57 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यममंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढववला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मानणाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाचा अर्थ समजून घ्यावा. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (cm Uddhav Thackeray slams bjp over hindutva)

राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात हिंदुत्वाचा अर्थ समजून सांगितला. भागवतांना मानणारे लोक असतील तर त्यांनी नुसती काळी टोपी घालू नये. त्या टोपीखाली डोकं असणाऱ्यांनी थोडा विचारही केला पाहिजे. हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे. हिंदुत्वाबाबत काही लोक भ्रम पसरवित आहेत. हिंदुत्वाचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित करत आहेत, असं भागवत म्हणाले. त्यामुळे भागवतांनी सांगितलेला हा अर्थ समजून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला नाव न घेता लगावला.

मला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. मंदिर उघडत नाही म्हणून मला हे प्रश्न विचारले जात आहेत. याद राखा, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारच. तुम्हाला जर फटका मारून घ्यायचाच असेल तर जरूर या, असं आव्हान देतानाच बाबरी पडली तेव्हा कुठल्या बिळात शेपट्या घालून पडले होते? ज्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं ते लोक मला हिंदुत्वाबाबत विचारत आहे, असं सांगतानाच कोरोना आला की घंटा बडवा, थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व. इकडे गाय म्हणते माता आणि पलिकडे जाऊन खाता हेच का तुमचं हिंदुत्व?, असे टोलेही त्यांन लगावले.

तेव्हा कुठे होता

महाराष्ट्रात आगडोंब उसळला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक आणि शिवसेना नसती तर महाराष्ट्र वाचला नसता. त्यावेळी तुम्ही शेपूट घातलं आणि केवळ सत्तेची खूर्ची मिळाली म्हणून तुम्ही आज अंगावर येताय? तेव्हा कुठे होता?, असा परखड सवालही त्यांनी केला. (cm Uddhav Thackeray slams bjp over hindutva)

संबंधित बातम्या:

बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर सॉल्लिड प्रहार

Live | आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत, पण वाटेला जाल तर…, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात इशारा

CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

(cm Uddhav Thackeray slams bjp over hindutva)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.