नगरमध्ये जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं तब्लिगींना आवाहन

पालकमंत्री हसन मुश्रीम आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावर भाष्य केलं (Hasan Mushrif on Tablighi).

नगरमध्ये जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं तब्लिगींना आवाहन
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 7:06 PM

अहमदनगर : मरकजच्या कार्यक्रमासाठी निजामुद्दीनला गेलेल्या (Hasan Mushrif on Tablighi) किंवा त्यांच्या संपर्कात अलेल्यांनी तपासणीसाठी समोरुन पुढे यावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केलं आहे. हसन मुश्रीम आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावर भाष्य केलं (Hasan Mushrif on Tablighi).

“मरकजबाबत मी याआधीदेखील बोललो आहे. हा कार्यक्रम टाळायला हवा होता. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारने कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होती”, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. “9 राष्ट्रातील नागरिकांना आपण बंदी घातली होती. त्यांची विशेष तपासणी करण्यात आली नाही”, असा आरोप मुश्रीफ यांनी यावेळी केला.

“अहमदनगरमध्ये आतापर्यंत 1 लाख 20 हजार लोक इतर जिल्ह्यांतून आले आहेत. त्यांना सर्वांना स्थानिक पातळीवर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. नगरमध्ये आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात अहमदनगर शहरातील 11, जमखेड 6, संगमनेर 4 राहता 1 नेवासा 2 आणि श्रीरामपूरला 1 रुग्ण आढळले आहेत”, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

तब्लिगी जमातच्या दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमामुळे देशभरातील कोरोनाचा विळखा आणखी वाढला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील स्पष्टीकरण दिलं आहे.

राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे ‘कोरोना’संसर्गाचा वेग दुप्पट झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी दिली होती. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा सध्याचा काळ 4.1 दिवस इतका आहे, मात्र तब्लिगीचा कार्यक्रम नसता तर 7.4 दिवस इतका कालावधी अपेक्षित होता.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.