IPL 2020, KXIP vs KKR : वेगवान अर्धशतकासह कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नावे अनोख्या कामगिरीची नोंद
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत 58 धावांची खेळी केली. | (KKR Captain Dinesh Karthik Makes Record)
अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) यांच्यात डबल हेडरमधील पहिला सामना आज दुपारी (10 ऑक्टोबर) खेळण्यात आला. या चित्तथरारक सामन्यात कोलकाताने पंजाबचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम कोलकाताने फलंदाजी केली. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) या सामन्यात एक अनोखी कामगिरी केली आहे. कार्तिकने हा किर्तीमान एक कर्णधार म्हणून केला आहे. (KKR Captain Dinesh Karthik Makes Record)
कार्तिकने या सामन्यात 29 चेंडूत 58 धावा केल्या. या खेळीत कार्तिकने 8 फोर आणि 2 सिक्स लगावले. कार्तिकने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासोबतच कार्तिकने आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. याआधी कार्तिकने 2018 मध्ये असाच कारनामा केला होता. कार्तिकने 2018 मध्ये पंजाबविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
Back with a bang, and HOW! ?#KXIPvKKR #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/CakYM3e5xD
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 10, 2020
तसेच कार्तिकने आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार म्हणून 1 हजार धावा पूर्ण केल्या. यासह कार्तिक 1 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा 12 वा कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी अव्वल क्रमांकावर आहे.
Another Milestone!
DK completes 1000 runs as a skipper! ??#KXIPvKKR #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/bj2VJseJDM
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 10, 2020
धोनीने आतापर्यंत 4 हजार 244 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने कर्णधार म्हणून 4 हजार 143 धावा केल्या आहेत.
कार्तिकची आयपीएल कारकिर्द
दिनेश कार्तिक आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळतोय. कार्तिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये 188 सामने खेळले आहेत. या सामन्यात कार्तिकने 130 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 761 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 97 ही कार्तिकची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्याचा लेखाजोखा
कोलकाताने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताकडून कर्णधार दिनेश कार्तिक आणि सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 धावा केल्या. यानुसार पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान मिळाले. विजयी आव्हानाचे पाठलाग करताना पंजाबची शानदार सुरुवात झाली. मयंक अग्रवाल आणि कर्णधार लोकेश राहुलने 115 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र यानंतर पंजाबने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबने जिंकलेला सामना आपल्या बाजूने झुकवला. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. शेवटच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. मात्र ग्लेन मॅक्सवेलने चौकार मारला. त्यामुळे पंजाबचा अवघ्या 2 धावांनी पराभव झाला.
संबंधित बातम्या :
(KKR Captain Dinesh Karthik Makes Record)