AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जलयुक्त शिवार सक्सेस’, विरोधकांकडून बुद्धीभेदाचा प्रयत्न: मुख्यमंत्री

मुंबई: जलयुक्त शिवार हे सरकारचं सर्वात मोठं यश आहे. पण विरोधकांकडून केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. केवळ 40 टक्के पाऊस पडूनही राज्याची उत्पादकता वाढली, हे जलयुक्त शिवारचं यश आहे. गेल्या वर्षी 90 टक्के पाऊस […]

'जलयुक्त शिवार सक्सेस', विरोधकांकडून बुद्धीभेदाचा प्रयत्न: मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई: जलयुक्त शिवार हे सरकारचं सर्वात मोठं यश आहे. पण विरोधकांकडून केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

केवळ 40 टक्के पाऊस पडूनही राज्याची उत्पादकता वाढली, हे जलयुक्त शिवारचं यश आहे. गेल्या वर्षी 90 टक्के पाऊस पडूनही टँकरची संख्या वाढली होती, मात्र ती कमी झाली आहे, ही जलक्रांती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवारमुळे प्रगती होतेय हे कळल्यावर अनेकांनी कुदळ फावडं घेऊन फोटो काढून ट्विट केले. पण आता पाणी पातळी घटल्याचं सांगून बुद्धीभेद केला जात आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेमुळे 4 मीटरने पाणी पातळी वाढली आहे. यंदा पातळी खाली गेली कारण पाऊस कमी झाला. पाऊस कमी झाल्याने पेरणी झालेल्या पिकाला जमिनीतील पाणी मिळालं, त्यामुळे पातळी घसरली.  जी काही पीकं वाचली, ती यामुळे वाचली. पाण्याचा अति उपसा झाला. पाणी पातळी मागच्या वर्षी वाढली, यंदा पाऊस कमी आणि उपसा जास्त झाला, त्यामुळे पातळी घटली. गेल्या तीन वर्षात पातळी वाढली त्याबद्दल कोण बोललं का? हाच बुद्धीभेद आहे.  ज्या गावात जलयुक्त शिवारची कामं झाली, त्या गावातील पाणी पातळी घटण्याचं प्रमाण कमी, अन्य गावात हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबईत प्रेस कॉन्फरन्स करणाऱ्यांनी गावात जावून पाहावं, जलयुक्तचं यश दिसेल, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

1 लाख शेततळी सांगितली होती, प्रत्यक्षात 1 लाख 37 हजार शेततळी झाली आहेत. पश्चिम महाराष्ठ्रातील टेंभू योजना आमच्या काळात पूर्ण करतोय, 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.  15 वर्षात शेतमालाची खरेदी 350 कोटी होती, मागील तीन वर्षात 8 हजार कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे  गुणात्मक, विकासात्मकमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वात पुढे महाराष्ट्र

महाराष्ट्र हा सर्वच बाबतीत प्रगतीपथावर आहे.  देशातील 49 टक्के FDI एकट्या महाराष्ट्रात आहे. परकीय गुंतवणूक सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे.  औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे, शिक्षण क्षेत्रात 13 वरुन तिसऱ्या नंबरवर आला आहे. आरोग्य क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. ग्रामविकास, सिंचन अशा विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

संबंधित बातम्या  

‘उदयनराजे तर छत्रपती, ते आमच्या पक्षात आले तर स्वागतच’ 

शिवस्मारक बोट दुर्घटनेनंतरही मुख्यमंत्री ‘त्या’ घोषणेवर ठाम!   

जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....