कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू, एका दिवसात 79 पोलिसांना कोरोना, बाधितांची संख्या 1140 वर

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Maharashtra Police Corona Positive Cases) आहे. राज्यात आज (16 मे) एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू, एका दिवसात 79 पोलिसांना कोरोना, बाधितांची संख्या 1140 वर
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 12:55 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Maharashtra Police Corona Positive Cases) आहे. राज्यात आज (16 मे) एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर  1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे (Maharashtra Police Corona Positive Cases) .

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, त्यांनादेखील आता कोरोनाची लागण होत आहे. गेल्या तीन दिवसांत 196 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (16 मे) एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काल एका दिवसात 60 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 140 वर पोहोचला आहे. यात 120 अधिकारी आणि 1020 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 88 अधिकारी आणि 774 पोलीस कर्मचारी अशा एकूण 864 पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत. तर 32 अधिकारी आणि 236 पोलीस कर्मचारी असे एकूण 268 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनदरम्यान 1 लाख गुन्हे दाखल

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या 22 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा 54 वा दिवस आहे. तेव्हापासून राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 8 हजार 479 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 20 हजार 626 व्यक्तींना अटक करण्यात आली आहेत. तर 58 हजार 568 वाहन जप्त करण्यात आली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का असलेल्या 672 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे.

तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या 1305 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कालावधीत आरोपींकडून 4 कोटी 36 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 37 घटना घडल्या आहेत. काल वैद्यकीय व्यवसायिकांवर 3 हल्ले झाले.

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ

लॉकडाऊनदरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 231 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. याप्रकरणी 812 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात काल पोलिसांवर हल्ल्याच्या 4 घटना घडल्या. आतापर्यंतच्या हल्ल्यात 85 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या :

तब्बल 22 तास घराची दारं बंद, कोरोनाला उंबरठा ओलांडू न देणारं बीडमधील आदर्श गाव

प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, अभिजीत बिचुकलेचं पंतप्रधान मोदींना पत्र

पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्ससाठी तीन तास ताटकळत, खुर्चीवर बसून वाट पाहणाऱ्या रुग्णाने बायको-मुलासमोर प्राण सोडले

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.