उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती का?, नारायण राणेंचा प्रहार

भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे (Narayan Rane slams CM Uddhav Thackeray).

उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती का?, नारायण राणेंचा प्रहार
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 7:25 PM

सिंधुदुर्ग : “विधानसभेमध्ये सावरकरांचा गौरवाचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. मी अध्यक्षांना काही बोलत नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांना विचारतो कायद्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे नाहीत का? उद्धव ठाकरे यांना थंडी वाजत होती का लाज वाटत होती, सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव का नाही घेतला?”, असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी केला (Narayan Rane slams CM Uddhav Thackeray). सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडण्यात कसलीच अडचण नव्हती. मात्र, या प्रस्तावामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज झाल्या असत्या आणि त्यांनी सरकारमधील पाठिंबा काढून घेतला तर घरी जावं लागलं असतं”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. त्याचबरोबर “मुख्यमंत्री काही बोलत नाहीत, करत नाहीत. सगळं अजित पवार करतात”, अशी टीकादेखील नारायण राणे (Narayan Rane slams CM Uddhav Thackeray) यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काल (26 फेब्रुवारी) पुण्यतिथी होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अधिवेशनात राज्य सरकारने सावरकरांचा गौरवाचा ठराव मांडावा, असा प्रस्ताव भाजपने मांडला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमांवर बोट ठेवत तसं करता येणार नाही असं सांगितलं. याच मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.

“मी सत्ताधारी पक्षाचा निषेध करतो. काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुणासाठीही सत्तेत नाहीत. ते स्वत:च्या फायद्यासाठी एकत्र आले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? कर्जमाफीची तारीख तरी सांगा”, असं नारायण राणे म्हणाले.

“राज्य सरकार मच्छिमारांना नुकसान भरपाई देणार होतं. ते दिलं का? मच्छिमारांची उपासमार आम्ही सहन करणार नाहीत. त्यामुळे भाजप आंदोलन करणार”, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.

आणखी बातम्या 

सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा चर्चेत, फडणवीसांसोबत फोटो, लूक हू आय मेट टुडे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.