महाराष्ट्रात ‘लोटस’चं पीक येणार नाही; बिहारमध्ये भूकंप होऊ शकतो: संजय राऊत
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं भाकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. (political earthquake soon in bihar: sanjay raut)
मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं भाकीत वर्तवतानाच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (political earthquake soon in bihar: sanjay raut)
‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधताना संजय राऊत यांनी बिहार निवडणूक निकालापासून ते ऑपरेशन लोटसपर्यंतच्या विविध प्रश्नांवर मोकळीढाकळी मते मांडली. ही मते मांडतानाच अधूनमधून भाजपला फटकारेही लगावले. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास नितीशकुमारांना भाजपचं मांडलिक होऊन राहावं लागेल आणि तो त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. नितीशकुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये कधीही राजकीय भूकंप येऊ शकतो, असं राऊत म्हणाले. नितीशकुमारांनी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना दगा दिला. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनाही दगा दिला होता. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे ते काय करतील याची काहीही शाश्वती देता येत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.
लोजपाचे नेते चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहा यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. एवढ्या मोठ्या केंद्रीय सत्तेला पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी-शहांनी मनात आणलं असतं तर पासवान यांचं बंड मोडून काढलं असतं. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे पासवान यांनी नितीशकुमारांचं 20 जागांवर नुकसान केलं. त्यामुळे नितीशकुमार बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले, असं राऊत यांनी सांगितलं.
ऑपरेशन लोटस होणार नाही
बिहार निवडणुकीनंतर आता राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांनीही ऑपरेशन लोटस शंभर टक्के होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही. आमचं सरकार 5 वर्षे व्यवस्थित चालेल, असा दावा त्यांनी केला.
एमआयएमचा वापर कोण करतं हे सर्वांना माहीत
एमआयएममुळे काँग्रेस-आरजेडीला सर्वाधिक फटका बसल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत, त्याबाबत तुमचं निरीक्षण काय आहे? असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर एमआयएम कुणासाठी काम करते. त्यांचा वापर कोण करतं. हे जगजाहीर आहे. सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असं राऊत म्हणाले.
EXCLUSIVE | बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, नितीश कुमार धोका देण्यासाठी प्रसिद्ध : संजय राऊतhttps://t.co/INDBLeSpnx@rautsanjay61 #BiharElection2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2020
संबंधित बातम्या:
नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित, पण आव्हानांचा डोंगर समोर, नेमकी कोणती आव्हानं?
राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी
(political earthquake soon in bihar: sanjay raut)