'दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरनंतर आता 'शी इज मिसिंग'

नवी मुंबई : पुण्यातल्या ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या पोस्टरबद्दल अवघ्या महाराष्ट्रात तुफान चर्चा झाली. या पोस्टरचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता सगळ्यांनाच असताना, आता नवी मुंबईतही असेच काहीसे पोस्टर जागोजागी चिकटवलेले दिसून येत आहेत. ‘शी इज मिसिंग’ असे नवी मुंबईतील पोस्टरवर छापण्यात आले आहे. वाचा : ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला? पुण्यामध्ये …

'दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरनंतर आता 'शी इज मिसिंग'

नवी मुंबई : पुण्यातल्या ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या पोस्टरबद्दल अवघ्या महाराष्ट्रात तुफान चर्चा झाली. या पोस्टरचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता सगळ्यांनाच असताना, आता नवी मुंबईतही असेच काहीसे पोस्टर जागोजागी चिकटवलेले दिसून येत आहेत. ‘शी इज मिसिंग’ असे नवी मुंबईतील पोस्टरवर छापण्यात आले आहे.

वाचा : ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला?

पुण्यामध्ये झळकलेले ‘शिवडे, आय एम सॉरी’ आणि मुंबई-पुण्यात सध्या चर्चेत असलेले ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या विचित्र बॅनरबाजीनंतर आता खारघर सेक्टर 4 परिसरातील रस्त्यांवरील खांब व भिंतींवर ‘शी इज मिसिंग’चे अनोखे पोस्टर झळकताना पहायला मिळत आहे. मात्र, या पोस्टरमध्ये महिलेचा स्पष्ट चेहरा व संपर्क क्रमांक नसल्याने हे पोस्टर नेमकं कुणी व काय हेतूने लावलेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

तसेच, ज्या भागात हे पोस्टर झळकत आहेत,. त्या भागात नामांकित शिक्षण संस्थांचे कॉलेज आहेत. त्यामुळे संपूर्ण खारघरमध्ये सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे. पुणे-मुंबईनंतर आता नवी मुंबईतही असे विचित्र पोस्टर झळकू लागलेत. या पोस्टरसंदर्भात खारघर पोलिसांना देखील कुठलीही माहिती नसून, असे पोस्टर लावताना कुणी आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *