AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन नंबर घोळातून तरुणाला अश्लील फोन, सनी लिओनीचा खट्याळ माफीनामा

मुंबई : ‘अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा मोबाईल नंबर’ आतापर्यंत अनेक जणांनी गुगलवर सर्च केला असेल. ‘अर्जुन पतियाला’ (Arjun Patiala) चित्रपट पाहताना सनीचा नंबर आपसूकच मिळाल्याच्या आनंदात अनेकांनी तो डायल करुन पाहिला, मात्र तो निघाला भलत्याच तरुणाचा. या घोळामुळे झालेल्या मनस्तापाबद्दल सनी लिओनीने संबंधित तरुणाची माफी मागितली आहे. मात्र क्षमा मागतानाही तिने अवखळपणा दाखवला. […]

फोन नंबर घोळातून तरुणाला अश्लील फोन, सनी लिओनीचा खट्याळ माफीनामा
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 6:59 PM

मुंबई : ‘अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा मोबाईल नंबर’ आतापर्यंत अनेक जणांनी गुगलवर सर्च केला असेल. ‘अर्जुन पतियाला’ (Arjun Patiala) चित्रपट पाहताना सनीचा नंबर आपसूकच मिळाल्याच्या आनंदात अनेकांनी तो डायल करुन पाहिला, मात्र तो निघाला भलत्याच तरुणाचा. या घोळामुळे झालेल्या मनस्तापाबद्दल सनी लिओनीने संबंधित तरुणाची माफी मागितली आहे. मात्र क्षमा मागतानाही तिने अवखळपणा दाखवला.

‘अर्जुन पतियाला’ या चित्रपटात सनीने छोटीशी भूमिका केली आहे. एका सीनमध्ये ती दलजित दोसांजच्या व्यक्तिरेखेला आपला मोबाईल नंबर देते. हा सनीचा खराखुरा मोबाईल क्रमांक असल्याच्या समजूतीतून अनेक प्रेक्षकांनी तो टिपून घेतला. सिनेमा संपताच या क्रमांकावर फोन करण्याचा खेळ सुरु झाला.

अश्लील फोन आणि मेसेज

हा नंबर निघाला दिल्लीतील प्रीतमपुरा भागाचा रहिवासी असलेल्या 27 वर्षीय पुनित अग्रवाल याचा. सनीसोबत बोलण्याची इच्छा व्यक्त करणारे अनेक फोन, अश्लील मेसेज त्याच्या क्रमांकावर येऊ लागल्यामुळे त्याला भलताच मनस्ताप झाला. सुरुवातीला कोणीतरी चेष्टामस्करी करत असेल, अशी त्याची समजूत झाली. मात्र हा प्रकार वाढतच गेल्याने त्याने पोलिसात धाव घेतली होती. दिवसाला शंभर ते दीडशे कॉल येत असल्याचं पुनितने तक्रारीत म्हटलं आहे.

खट्याळ माफीनामा

‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सनीने पुनितची माफी मागितली आहे. ‘तुला मनस्ताप व्हावा, अशी माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मला माफ कर. मात्र तुला फारच इंटरेस्टिंग लोकांचे फोन आले असतील’ असं खट्याळपणे म्हणत सनीने या प्रकरणावर पडदा टाकला. पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देणारा पुनित सनीच्या माफीनाम्यानंतर काय भूमिका घेतो, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

26 जुलै रोजी अर्जुन पतियाला हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. खरं तर मोबाईल क्रमांक अर्धवट देणे किंवा वापरात नसलेले नंबर सांगणे, लेखी स्वरुपात असल्यास ते ब्लर करणे, असे प्रकार निर्माते करतात. मात्र यावेळी धडधडीत नंबर दिसल्याने पुनितला नसता त्रास झाला. आता सिनेमात या सीनमधून क्रमांक वगळला जाणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.