मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल. 

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? 'हे' आहेत पर्याय
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 6:26 AM

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील.

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

मतदान ओळखपत्राऐवजी तुम्ही इतर सरकारी ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यक्रमपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्र तुम्ही मतदान करता वेळेस घेऊन जाऊ शकतात.

मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का हे पाहावे लागेल. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळेल. याबद्दल सरकारने काही सूचनाही दिल्या आहेत.

सूचना :

  • फोटो ओळखपत्रावर तुम्ही मतदान करु शकत नाही. यासाठी तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.
  • मतदान केंद्रावर मतदान पावती ओळखपत्रासोबत वरील दिलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?

  • पासपोर्ट
  • वाहन चालक परवाना
  • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम
  • सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)
  • छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
  • पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड
  • मनरेगा कार्यक्रमपत्रिका
  • कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  • छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज
  • खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र
  • आधारकार्ड

संबंधित बातम्या 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : मतदानाचे ताजे अपडेट
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.