पुण्यात वसतीगृहात साकारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह, 300 कैद्यांची व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा जेलमधून (Yerwada Jail) अनेक कच्च्या कैद्यांना जामीनाव सोडण्यात आलं आहे.

पुण्यात वसतीगृहात साकारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह, 300 कैद्यांची व्यवस्था
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 8:41 AM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा जेलमधून (Yerwada Jail) अनेक कच्च्या कैद्यांना जामीनाव सोडण्यात आलं आहे. तर नव्याने येणाऱ्या कैद्यांकरिता जेल प्रशासनाने येरवड्यातील बार्टी कार्यालयाजवळील मागासवर्गीय मुलांमुलींच्या वसतीगृहात तात्पुरता व्यवस्था केली आहे. या तात्पुरता स्वरुपाच्या जेलमध्ये आतापर्यंत 92 पुरुष कैदी तर 09 महिला कैद्यांना पाठवण्यात आलं आहे. या वसतीगृहात 300 कैद्यांना ठेवता येणार आहे (Yerwada Jail).

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. विशेष म्हणजे जेलमधील कैद्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. त्यामुळे कच्च्या कैद्यांना जामीनावर सोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. येरवडा जेलमधून आतापर्यंत अशा अनेक कैद्यांना जामीनावर सोडण्यात आलं आहे. मात्र, नव्याने येणाऱ्या कैद्यांकरिता जेल प्रशासनाने मागासवर्गीय मुलांमुलींच्या वसतीगृहात तात्पुरत्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

कैद्यांची आरोग्याच्या दृष्टीनेदेखील काळजी घेतली जात आहे. कैदी तुरुंगात आल्यानंतर त्याचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. कोणत्याही कैद्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याला तातडीने रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना त्रास होऊ नये यासाठी नव्या तात्पुरत्या कारागृहाची निर्मिती केल्याची माहती येरवडा कारागृह अधिक्षक यु.टी.पवार यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 हजार पार

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर पोहोचली आहे. त्यामुळे धाकधुक वाढली आहे. कोरोनामुळे काल (24 मे) दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मुंबई-पुणे या दोन शहरांपाठोपाठ राज्यातील इतर शहर आणि ग्रामीण भागातही कोरोना फोफावत चालला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, सरकार आणि प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीने प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या :

येरवडा जेलमधून सातारा जेलमध्ये पाठवलेल्या 4 कैद्यांना कोरोना, साताऱ्यातील रुग्णसंख्या 77 वर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.