केवळ रोजच्या दहा मिनिटाच्या मेडिटेशनने एकाग्रता वाढते; वाचा नवं संशोधन काय सांगतं?

मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते. एका संशोधनातून तसे सिद्ध झाले आहे. तब्बल आठ आठवडे रोज मेडिटेशन करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांवर संशोधकांनी अभ्यास केला. (10 Minutes Of Daily Meditation Increases A Person's Concentration, Claim Researchers)

केवळ रोजच्या दहा मिनिटाच्या मेडिटेशनने एकाग्रता वाढते; वाचा नवं संशोधन काय सांगतं?
ध्यानधारणा
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 7:39 AM

नवी दिल्ली: मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते. एका संशोधनातून तसे सिद्ध झाले आहे. तब्बल आठ आठवडे रोज मेडिटेशन करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांवर संशोधकांनी अभ्यास केला. हे विद्यार्थी आठवड्यातून पाच दिवस रोज दहा मिनिटे मेडिटेशन करत होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या ब्रेनची स्कॅनिंग करण्यात आली. त्यात मेडिटेशननंतर या मुलांच्या ब्रेनमध्ये एकाग्रता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. (10 Minutes Of Daily Meditation Increases A Person’s Concentration, Claim Researchers)

न्यूयॉर्कच्या बिंगहॅम्प्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर संशोधन केलं आहे. एकाग्रतेने विचार करण्याच्या आणि ध्यान धारणा करण्याच्या दोन कनेक्शनला मेडिटेशन जोडते. जेव्हा एखादी व्यक्ती एखादे काम मन लावून करते तेव्हा ही दोन कनेक्शन काम करत असतात. अल्झायमर आणि ऑटिझ्मचे कनेक्शन सुद्धा याच नेटवर्कने होते, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

आधी मेडिटेशन मग अभ्यास

संगणत तज्ज्ञ जॉर्ज वेंसचेंक आणि न्यूरोइमेजिंग एक्सपर्ट यांच्यात झालेल्या चर्चेतून आणि एका प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जॉर्ज वेंसचेंक हे बिंगहॅम्प्टन यूनिव्हर्सिटीच्या संगणकीय विभागात काम करतात. स्वत: डॉ. वेंसचेंक गेल्या अनेक वर्षांपासून मेडिटेशन करत आहेत. न्यूयॉर्कच्या नामग्याल मोनेस्ट्रीमध्ये ते रिसर्च करत आहेत. या मोनेस्ट्रीचं कनेक्शन बौद्ध धर्म गुरू दलाई लामांशी आहे. मी मोनेस्ट्रीत राहून शिक्षण घेतलं. बौद्ध धर्माचा मी तीन वर्ष अभ्यास केला. या ठिकाणी वास्तव्याला असताना मेडिटेशनही करत होतो. तेव्हा मेडिटेशनचा मेंदूवर काय परिणाम होतो, असा विचार मनात आला आणि संशोधनास सुरुवात केल्याचं वेंसचेंक यांनी सांगितलं.

संशोधनात काय आढळलं?

त्यानंतर वेंसचेंक यांनी 8 आठवडे एकूण दहा विद्यार्थ्यांवर संशोधन केलं. त्यानंतर या विद्यार्थ्यांचं एमआरआय केलं. एमआरआयनुसार मेंदूचा पॅटर्न समजून घेण्यात आला. मेडिटेशन पूर्वी या विद्यार्थ्यांचा मेंदू एकाग्र नसल्याचं आढळून आलं. मेडिटेशननंतर या विद्यार्थ्यांचा मेदू एकाग्र झाल्याचं पाहायला मिळालं.

मेडिटेशन कधी करावं

ध्यानधारणा कशी करावी? याची सुरुवात कशी करावी? त्यासाठी जमिनीवर बसलं पाहिजे का? त्यासाठी अॅपची मदत घ्यायला हवी का? एखाद्या मंत्राचा जप करायला हवा का? ध्यानसाधना करणारे गुरू आणि मानसशास्त्रांनुसार ध्यान धारणा करण्याचा प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते. ज्याला जे योग्य वाटतं त्याने त्याचा वापर केला पाहिजे.

ध्यानाचं विशिष्ट तंत्र नाही

जेव्हा तुम्ही ध्यानधारणेबाबत विचार करता तेव्हा तुमच्या मेंदूत काय येतं? शांत वातावरण, योगा मॅट आणि सुंदर घर? तुम्हाला ध्यान करण्यासाठी या गोष्टी कन्फर्टेबल वाटतात तर त्या गोष्टी असू द्या. काही लोक सरळ झोपून किंवा खुर्चीवर बसून योगा करतात. शरीर शांत आणि मन एकाग्र करण्यासाठी अशा पोज शोधल्या जातात. (10 Minutes Of Daily Meditation Increases A Person’s Concentration, Claim Researchers)

संबंधित बातम्या:

Home Remedies For Headache : वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा!

वजन कमी करण्याच्या सामान्य चुका ज्यामुळे तुमचे वजन वाढते, जाणून घ्या असे का होते?

Health Care : गर्भपात का होतो? जाणून घ्या 4 मोठी कारणे आणि अशाप्रकारे घ्या काळजी!

(10 Minutes Of Daily Meditation Increases A Person’s Concentration, Claim Researchers)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.