थोडा दिलासा, थोडी धडधड ! देशात 24 तासांत 1,054 नवे रुग्ण, पॉझिटीव्हिटी दर 0.03 टक्क्यांवर नियंत्रणात
एकीकडे मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख वाढीस लागलेला असताना सक्रिय रुग्णसंख्या मात्र दिलासादायक पातळीवर आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण अजून वाढलेले नाही. सद्यस्थितीत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 11,132 इतकी आहे. त्यामुळे पॉझिटीव्हिटी रेट 0.03 टक्क्यांपर्यंत नियंत्रणात राहिला आहे.

नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा भयंकर उद्रेक झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटने अनेक देशांची चिंता वाढवली आहे. याच दरम्यान भारतात शिरकाव केलेल्या ‘एक्सई’ (XE) या नव्या व्हेरिएंटने देशाची धडधड वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांच्या वर नोंद होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात कोरोनाचे 1,054 नवे रुग्ण (New Patients) आढळले तर गेल्या 24 तासांत संसर्गामुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे एकूण कोरोना बळींचा आकडा 5,21,685 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घसरण नव्या विषाणुच्या शिरकावामुळे थांबून संसर्ग पुन्हा वाढीस लागतो की काय अशी चिंता सरकारला सतावते आहे. याच अनुषंगाने केंद्राने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह पाच राज्यांना सतर्कतेच्या सूचनाही दिलेल्या आहेत. (1,054 new patients in the country in 24 hours positivity rate under control at 0.03 per cent)
सक्रिय रुग्णांचा आकडा दिलासादायक
एकीकडे मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख वाढीस लागलेला असताना सक्रिय रुग्णसंख्या मात्र दिलासादायक पातळीवर आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण अजून वाढलेले नाही. सद्यस्थितीत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 11,132 इतकी आहे. त्यामुळे पॉझिटीव्हिटी रेट 0.03 टक्क्यांपर्यंत नियंत्रणात राहिला आहे. चीनमध्ये शांघायसारख्या शहरात कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट भयंकर वाढल्याने तेथील रुग्णालयांवर प्रचंड ताण पडला आहे. तशी स्थिती भारतात उद्भवू नये म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारे अलर्ट मोडवर आहेत.
कोरोनामुक्तीचे प्रमाण 98.76 टक्क्यांवर
देशात कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत करोडो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. त्यासोबतच आजपासून प्रीकॉशन अर्थात बूस्टर डोस घेण्यासही सुरवात झाली आहे. लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि बूस्टर डोसचे संरक्षण कवच यामुळे देशातील कोरोनामुक्तीचा दरही दिलासादायक राहिला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला कोरोनामुक्तीचे प्रमाण 98.76 टक्के आहे. मागील 24 तासात 1,258 लोक कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या 4,25,02,454 वर गेली आहे. (1,054 new patients in the country in 24 hours positivity rate under control at 0.03 per cent)
India reports 1054 fresh #COVID19 cases, 1258 recoveries, and 29 deaths in the last 24 hours.
Active cases: 11,132 (0.03%) Death toll: 5,21,685 Total recoveries: 4,25,024,54
1,85,70,71,655 crore vaccine doses have been administered so far. pic.twitter.com/6QRjMS1lia
— ANI (@ANI) April 10, 2022
इतर बातम्या
Health Care : जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!
Extended Lab: भारतातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब सुरू, कॅन्सरवर होणार आधुनिक उपचार