थंडीच्या दिवसात संत्री खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ
आपल्यातील प्रत्येकाला संत्र हे फळ खूप आवडत असेल. परंतु अशी काही लोक आहेत जे संत्र हे हंगामी फळं खाण्यास नकार देतात. कारण त्यांच्या घश्यात सेवनाने खोकला आणि खवखव होत असते.
थंडी सुरु झाली कि संत्र या फळाचा हंगाम सुरु झाला. तसेच चवीला आंबट-गोड असलेला हे फळ सगळ्यांच्या आवडीचे असतं. पण या हंगामी फळाचा आस्वाद घेणं अनेक लोकं टाळतात. कारण संत्र्याला आंबट चव असते आणि बहुतेक लोकांना थंडीच्या दिवसात खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. म्हणून अनेक जण संत्र खात नाही.
त्यातच अशी काही लोकं आहेत ज्यांना हंगामी फळ खाण्याची खूप इच्छा असते, परंतु लोकांना वाटते की या फळांची चव आंबट असल्याने घशाशी संबंधित समस्या वाढू शकते. तुमचाही असाच विश्वास आहे का? चला तर मग जाणून घेऊया आणि संत्र खाण्याची योग्य वेळ आणि या फळाचे जबरदस्त फायदे
संत्री का खावी?
हिवाळ्यात आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या कमी होत असते. ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव वाटणे अश्या समस्या खूप लवकर होत असतात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः या ऋतूत हंगामी फळे आणि भाज्या रोज खाव्यात. प्रत्येक हंगामी फळे आणि भाज्यांचे त्या ऋतूत खाण्याचे फायदे आहेत. संत्रा हे हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी फळांपैकी एक आहे, जे या ऋतूत खाणे खूप चांगले मानले जाते. हे हिवाळ्यातील सुपरफूड आहे, या फळामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.
हे फळ खूप फायदेशीर आहे
१) प्रतिकारशक्तीसाठी सर्वोत्तम
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. हे रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
२) हृदयाचे आरोग्य वाढेल
अहवालात असे म्हटले आहे की संत्री आणि द्राक्ष ही फळ खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात.
३) सर्दीपासून बचाव होतो
थंडीत मध्ये आपल्या शरीरात व्हिटॅमिनसची कमतरता झाल्याने सर्दी होते. शरीरात सामान्य सर्दीमध्ये व्हिटॅमिन सी फायदेशीर असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो.
४) वजन कमी होण्यास मदत होईल
संत्र्यांमध्ये असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कारण संत्र्यातील फायबर आपल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. यात फायबरदेखील चांगल्या प्रमाणात असते, जे पाचन आरोग्यास प्रोत्साहित करते.
५) त्वचेसाठी सर्वोत्तम
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. हे दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते.
संत्री किती वाजता खावी
तुम्हाला जरा हे हंगामी फळ खायचे असल्यास सकाळच्या सुमारास म्हणजे दुपारी १२ च्या आसपास संत्र खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खोकला तसेच घश्यात खवखव देखील होणार नाही. तसेच संत्र संध्याकाळी किंवा रात्री खाणे टाळा.