Health Tips: निरोगी राहण्यासाठी प्रत्येक महिलेनं कराव्यात ‘या’ 6 मेडिकल टेस्ट

रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिला त्यांच्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळेच छोट्यातली छोटी समस्या नंतर वाढून मोठी होते. आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेणे हे प्रत्येक महिलेनं (Women health) प्राधान्याने करायला हवं.

Health Tips: निरोगी राहण्यासाठी प्रत्येक महिलेनं कराव्यात 'या' 6 मेडिकल टेस्ट
Medical testsImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:18 AM

रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिला त्यांच्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळेच छोट्यातली छोटी समस्या नंतर वाढून मोठी होते. आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेणे हे प्रत्येक महिलेनं (Women health) प्राधान्याने करायला हवं. जसजसं वय वाढतं, तसतसे शरीरात अनेक बदल होत असतात. वयानुसार शारीरिक स्वास्थ्य नेहमीप्रमाणे राहत नाही. यासाठी वेळोवेळी महिलांनी काही तपासण्या करणं गरजेचं आहे. या तपासण्यांमुळे (medical tests) बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. एखादी शारीरिक समस्या (health problems) असेल तर त्यावर वेळीच उपचार करता येतात. या सहा महत्त्वपूर्ण तपासण्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात..

पॅप स्मीयर टेस्ट- पॅप स्मीयर टेस्ट ही एक स्क्रीनिंग प्रक्रिया आहे, ज्याचा उपयोग सर्वसाधारणपणे सर्वाइकल कॅन्सरच्या निदानासाठी केलं जातं. प्रामुख्याने गर्भाशयातील कॅन्सर किंवा कॅन्सरच्या पेशींच्या उपस्थितीबाबत जाणून घेण्यासाठी ही तपासणी केली जाते.

पेल्विक टेस्ट- पेल्विक टेस्टमध्ये योनी, गर्भाशय, मूत्राशय, फॅलोपियन ट्यूब, अंडाशय यांची तपासणी केली जाते. रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी पेल्विक टेस्ट महत्त्वाची ठरते.

मॅमोग्राम- मॅमोग्राम एक एक्स-रे आहे, ज्याद्वारे महिलांच्या स्तनांची तपासणी केली जाते. ही तपासणी मॅमोग्राफी सेंटरमध्ये खास उपकरणं वापरून केली जाते. अगदी सूक्ष्म प्रमाणात रेडिएशन वापरून स्तनाचे एक्स-रे काढण्यात येतात. रेडिओलॉजिस्ट या एक्स-रेचा अभ्यास करून रिपोर्ट तयार करतात.

थायरॉइड फंक्शन टेस्ट- शरीरातील थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत, हे जाणून घेण्यासाठी हा तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं.

लिपिड पॅनल टेस्ट- या टेस्टमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण तपासलं जातं. बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण अधिक असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.

ब्लड प्रेशर टेस्ट- रक्तदाबासाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. कमी किंवा प्रमाणापेक्षा अधिक रक्तदाब असल्यास शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब तपासणी केली पाहिजे.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांना संपर्क करा)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.