Swine Flu in Maharashtra : स्वाईन फ्लूपासून सावधान! राज्यात गेल्या 8 महिन्यात तब्बल 98 रुग्ण दगावले

Swine Flu : पुणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 33 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यामध्ये 14 जणांचा स्वाईन प्लूमुळे बळी गेला आहे. तर सांगलीतही स्वाईन फ्लूने डोकेदुखी वाढवली आहे.

Swine Flu in Maharashtra : स्वाईन फ्लूपासून सावधान! राज्यात गेल्या 8 महिन्यात तब्बल 98 रुग्ण दगावले
प्रातिनिधिक फोटो...
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 7:05 AM

मुंबई : दरवर्षी पावसानंतर स्वाईन फ्लूच्या (Swine Flu in Maharashtra News) रुग्णांमध्ये वाढ नोंदवली जाते. अशातच गेल्या आठ महिन्यातली महाराष्ट्रातील (Maharashtra) स्वाईफ फ्लूच्या रुग्णांसंदर्भातली महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात गेल्या 8 महिन्यात तब्बल 98 रुग्ण स्वाईन फ्लूमुळे दगावलेत. मृत्यू झालेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुणे (Pune Swine Flu), ठाणे आणि सांगलीमधील असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 33 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यामध्ये 14 जणांचा स्वाईन प्लूमुळे बळी गेला आहे. तर सांगलीतही स्वाईन फ्लूने डोकेदुखी वाढवली आहे. सांगलीत गेल्या 8 महिन्यांत 13 रुग्णांना स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूचे एकूण 2 हजार 337 रुग्णांचं निदान झालं होतं. त्यातील बहुतांश रुग्ण बरेदेखील झाले आहेत.

1 जानेवारी 2022 ते 28 ऑगस्ट 2022 या आठ महिन्यांच्या काळातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांबाबतची आकडेवारी आरोग्य विभागाच्या वतीने जारी रकण्यात आली. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता राज्यातील जनतेनं स्वाईन फ्लूला गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली जातेय. तसंच आता उत्सव काळात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू नये, यासाठीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं जाणकारांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

स्वाईन फ्लूमुळेकोणत्या जिल्ह्यात किती बळी?

  • कोल्हापूर – 13 मृ्त्यू
  • नाशिक – 12 मृ्त्यू
  • सातारा – 5 मृ्त्यू
  • अहमदनगर – 5 मृ्त्यू
  • मुंबई – 3 मृ्त्यू

कुठे किती रुग्णांची नोंद?

  • पुणे – 770 रुग्ण
  • ठाणे – 474
  • मुंबई – 348
  • नाशिक – 195
  • कोल्हापूर – 159

काळजी घ्या!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून खबरदारी बाळगण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याने विशेष आव्हान करण्यात आलंय. अशक्तपणा वाटणं, ताप येणं अशा प्रकारची स्वाईन फ्लूबाबत लक्षणं असल्यास दुर्लक्ष करु नये. लगेचच वैद्यकीय मदत घ्यावी, असं आवाहन राज्यातील जनतेला आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.