Healthy Drinks: थंडीत हायड्रेटेड राहण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी प्या ‘ही’ ड्रिंक्स
हिवाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी, तुम्ही आहारात अनेक प्रकारच्या हेल्दी पेयांचा समावेश करू शकता. ही पेयं तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत करतील.
नवी दिल्ली – हिवाळ्याच्या (winter) दिवसात बऱ्याच जणांना कोरड्या त्वचेची (dry skin) समस्या भेडसावते. अशावेळी त्वचेची नीट काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हिवाळ्यात त्वचा निरोगी राहण्यासाठी तुम्ही बऱ्याच प्रकारची हेल्दी पेयं (healthy drinks) पिऊ शकता. त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार (hydrated and glowing skin) ठेवण्यास मदत होईल. तसेच या पेयांमुळे आपल्याला आरोग्याचे इतरही अनेक फायदे मिळतील.
आपल्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढवणे, अशक्तपणा दूर करणे आणि डोकेदुखीच्या समस्या यांच्यावर मात करण्यासही यासारख्या समस्याही दूर होतील. थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते. अशा वेळी त्वचा हायड्रेटेड रहावी आणि चमकदार बनावी यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पेयांचा आहारात समावेश करू शकता.
सूप
विविध भाज्यांचा वापर करून सूप तयार केले जाते. तुम्ही थंडीच्या दिवसात वेगवेगळी सूप पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या पोटात सर्व भाज्याही जातील आणि तुम्ही हायड्रेटेडही रहाल.
हिरव्या भाज्यांचा ज्यूस
हिरव्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. हिरव्या भाज्यांचा रस अथवा ज्यूस हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे या ज्यूसचे सेवन केल्याने आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच हिरव्या भाज्यांमधील अनेक पोषक घटकही शरीराला मिळतात. तुम्ही रोज त्याचे सेवन करू शकता. भाज्यांच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
हर्बल टी
हर्बल टीचे सेवन केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तुम्ही संध्याकाळी कॅमोमाइल टी चे सेवनही करू शकता. यामुळे रात्री चांगली झोपही लागते. हा चहा प्यायल्याने ताण दूर होतो. हर्बल टीमध्ये हिबिस्कस टी, पेपरमिंट टी आणि आल्याचा चहा इत्यादींचा समावेश आहे. या चहाचे सेवन केल्याने डोकेदुखी, बद्धकोष्ठता कमी होते, रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते, सूज येणे व सांधेदुखी कमी होते.
हळद घातलेले दूध
हळद घातलेले दूध हे भारतीय घरांमध्ये लोकप्रिय पेय आहे. दुधात कॅल्शिअम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. त्यात हळद घालून दूध प्यायले जाते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मा असून ती संरक्षण करण्याचे कार्य करते. हळदीचे दूध आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. हे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.