किशोर वयातच वजनावर नियंत्रण ठेवलात तर इनफर्टीलिटी टाळता येईल, नव्या संशोधनात महत्वाची माहिती!
पुरुष इनफर्टीलिटीचे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 40 वर्षात जगभरात कोणतेही स्पष्ट कारण नसताना सरासरी शुक्राणूंची संख्या निम्म्याने कमी झाली आहे, असे बोलताना ते म्हणाले आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. जसेजसे तुमचे वजन वाढण्यास सुरूवात होते.
मुंबई : वाढलेल्या वजनामुळे (Weight) अनेकजण त्रस्त आहेत. सध्याच्या खराब जीवनशैलीमध्ये अनेकांचे वजन झपाट्याने वाढते. रात्री उशीरापर्यंत जागणे, सकाळी उशीरा उठणे, व्यायामाचा अभाव आणि फास्टफूडचे अतिसेवन यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. महिला असो किंवा पुरूष (Men) प्रत्येकालाच वजन वाढण्याची समस्या भेडसावत आहे. वजन कमी करण्यासाठी जिम आणि डाएटही अनेकजण फाॅलो करतात. मात्र, हे सर्व करूनही लठ्ठपणा काही केल्याने कमी होत नाही. नुकताच एका संशोधनातून (Research) लठ्ठपणाविषयी एक महत्वाची माहिती पुढे आलीये. जर आपण किशोर वयामध्येच वजनावर नियंत्रण ठेवले तर पुढे जाऊन आपल्याला इनफर्टीलिटी टाळता येईल.
संशोधनातून महत्वाची माहिती पुढे
लहानपणी आणि किशोर वयामध्ये जर आपण आपल्या वजनावर लक्ष देऊन नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्न केला तर पुढील आयुष्यात पुरूषांना वंध्यत्व रोखता येईल. नुकताच एका अभ्यासाचे निष्कर्ष पुढे आले आहेत. एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक सभेत या संशोधनाचे निष्कर्ष सांगण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले आहे की, लठ्ठपणा जास्त असलेली मुले पौगंडावस्थेमध्ये इन्सुलिनची प्रतिकारशक्ती जास्त होते. वजन आणि इन्सुलिन पातळी यांवर नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजेच किशोर वयामध्ये आपण जर वजनावर नियंत्रण ठेवले तर इन्सुलिन पातळी पुढे जाऊन नियंत्रणात राहिल. असे इटलीतील कॅटानिया विद्यापीठातील प्रमुख संशोधक रोसेला कॅनरेला, एमडी यांनी सांगितले.
पुरुष इनफर्टीलिटीच्या प्रमाणामध्ये झपाट्याने वाढ
पुरुष इनफर्टीलिटीचे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 40 वर्षात जगभरात कोणतेही स्पष्ट कारण नसताना सरासरी शुक्राणूंची संख्या निम्म्याने कमी झाली आहे, असे बोलताना रोसेला कॅनरेला म्हणाले. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. जसेजसे तुमचे वजन वाढण्यास सुरूवात होते, तसे मधुमेहाची समस्या निर्माण होते. यामुळे वजनावर नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी व्यायाम करणे आवश्यक आहे. चमकदार आणि चकमकीत खाद्यपदार्थ खाण्यापासून चार हात लांब राहणे वजन कमी करणाऱ्यासाठी फायदेशीर ठरते. यासंदर्भात ani news ने सविस्तर रिपोर्ट दिलाय.