तुम्ही कधी स्टीम बाथ घेतला आहे का? मग घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या स्टीम बाथचे फायदे

Health – थकवा कमी करण्यासाठी अनेक जण स्टीम बाथ घेतात. महिला तर खास करुन सौंदर्य वाढविण्यासाठी स्टीम बाथचा उपयोग करतात. स्टीम बाथचे अनेक फायदे आहेत. मात्र तो योग्य पद्धतीने घेतला पाहिजे.

तुम्ही कधी स्टीम बाथ घेतला आहे का? मग घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या स्टीम बाथचे फायदे
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 1:17 PM

मुंबई : स्टीम बाथची गेल्या काही वर्षात खूप चर्चा वाढली आहे. मात्र स्टीम बाथला आयुर्वेद आणि प्राचीन काळापासूनच फार महत्त्व आहे. नॅचरोपॅथीमध्ये स्टीम बाथला विशेष महत्त्व आहे. स्टीम बाथमुळे वजन कमी होतं, ताण-थकवा कमी होतं तर सौंदर्य वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

स्टीम बाथ म्हणजे काय?

स्टीम बाथ म्हणजे एक खोली असते जिथे संपूर्ण खोली वाफेने भरलेली असते. स्टीम बाथ आपण जीम आणि स्पामध्ये जाऊन घेऊ शकतो. साधारण स्टीम बाथ रुमचे तापमान हे 110F येवढं असतं.

स्टीम बाथचे फायदे

1. वजन कमी करण्यासाठी स्टीम बाथचा फायदा होतो. स्टीम घेतल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. साधारण आपण अर्धा तास स्टीम घेतल्यामुळे शरीरात 600 कॅलरीज या बर्न होतात. 2. ताण , थकवा दूर होण्यासाठी स्टीम बाथ ही बेस्ट थेरपी आहे. तुम्हाला कामाचा खूप ताप असेल, चिंता असेल आणि नैराश्य वाटतं असेल तर स्टीम बाथ नक्की घ्यायला हवा. यामुळे तुमच्या शरीराला खूप बरं वाटतं. सोबतच तुम्हाला रात्री चांगली झोपही लागते. 3. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गरम वाफेमुळे शरीरातील ल्युकोसाईट उत्तेजित होतं त्यामुळे आपली रोगप्रतिकारणशक्ती वाढते. मात्र हे लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला नियमित स्टीम बाथ घेणं गरजेचं आहे. 4. स्टीम बाथने शरीरातील रक्तपेशींचा विस्तार होतो, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी स्टीम बाथ खूप फायदेशीर आहे. 5. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी स्टीम बाथची खूप मदत होते. 6. सांधेदुखीसाठी स्टीम बाथ खूप फायदेशीर आहे. 7. सौंदर्य वाढविण्यासाठी जास्त फायदा होतो.

या स्टीम रुमचे काही नियमही आहेत

1. स्टीम बाथ घेताना अंगावर कुठलेही दागिने नकोत. 2. स्टीम घेण्यापूर्वी अर्धा तास काही खाऊ नये. 3. स्टीम बाथ घेतल्यानंतर आंघोळ करा 4. स्टीम बाथ घेणार असाल तर भरपूर पाणी प्या 5. कायम टॉवेल सोबत ठेवा 6. महत्त्वाचे परफ्यूम लावून स्टीम बाथ घेऊ नका. 7. जास्त वेळा स्टीम बाथ करु नका महत्त्वाचं स्टीम बाथ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. News Keywords

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.