‘कोरोना’तून बरे झाल्यावर रुग्णांमध्ये हृदयासंबंधित समस्यांमध्ये वाढ, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

कोरोनानंतर उद्भवणारी सर्वात धोकादायक समस्या म्हणजे फुफ्फुसांवर होणारा परिणाम आणि श्वासोच्छवासाच्या येणारे अडथळे. परंतु, आता कोरोना विषाणू हृदयावर देखील परिणाम करतो, असे दिसून आले आहे.

‘कोरोना’तून बरे झाल्यावर रुग्णांमध्ये हृदयासंबंधित समस्यांमध्ये वाढ, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत...
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 12:29 PM

मुंबई : ‘कोरोना’ (Corona Virus) संक्रमित लोकांची या आजाराशी झुंज कदाचित त्यातून बरे झाल्यावरही संपत नाहीय. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या जीवघेण्या आजारातून बरे झाल्यानंतर तरूणांसह बर्‍याच लोकांमध्ये हृदयाच्या समस्या दिसून येत आहेत. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर कार्डियक समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे डॉक्टर म्हणत आहेत. या रुग्णांमध्ये चिंताग्रस्तता किंवा हृदयाची गती वाढणे, अशा सामान्य समस्या आढळतात. तर काही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा झटकादेखील काही प्रकरणांमध्ये दिसून आला आहे (After recovery from corona virus heart problem increased in patients).

कोरोनानंतर उद्भवणारी सर्वात धोकादायक समस्या म्हणजे फुफ्फुसांवर होणारा परिणाम आणि श्वासोच्छवासाच्या येणारे अडथळे. परंतु, आता कोरोना विषाणू हृदयावर देखील परिणाम करतो, असे दिसून आले आहे. हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी हा एक गंभीर धोका आहे.

संसर्गामुळे हृदयात सूज

कोरोना संसर्गामुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात आणि बर्‍याच रुग्णांच्या हृदयात जळजळ देखील होऊ शकते. अलीकडेच अशी समस्या उद्भवलेल्या एका 31 वर्षीय व्यक्तीवर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. या रुग्णास पूर्वी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कोणताही आजार नव्हता, तो पूर्णपणे निरोगी होता.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) कार्डिओलॉजीचे प्रोफेसर सुदीप मिश्रा म्हणाले, ‘कोव्हिड-19 मधून बरे झाल्यावर, तरूणांसह बरेच लोक सर्व प्रकारच्या ह्रदयाच्या समस्या घेऊन रुग्णालयात परत येत आहेत. हा विषाणूहृदयात सूज निर्माण करत आहे. व्हायरस-संक्रमित रूग्णाचा अहवाल नकारात्मक आल्यावरही ही सूज कायम दिसत आहे.’ (After recovery from corona virus heart problem increased in patients)

ते पुढे म्हणाले की, ‘यामुळे हृदयाचचे स्नायू कमकुवत होतात आणि रुग्णांना हृदयविकाराच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. हे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ देखील वाढवते आणि रक्ताच्या गाठी तयार होतात. रुग्णालयातील दर 10 पैकी एक व्यक्ती हृदयविकाराच्या समस्येमुळे रुग्णालयात परत येत आहे.’

इकोकार्डियोग्राफी करणे आवश्यक

मिश्रा म्हणाले, ‘कोरोनातून बरे झालेल्यांनी त्यांची इकोकार्डियोग्राफी करून घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्गाच्या वेळी सगळा फोकस फक्त फुफ्फुसांवर असतो. नंतर लोकांना कळले की, त्यांना हृदयविकाराची समस्या देखील निर्माण झाली आहे, ज्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले केले गेले.

फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटच्या कार्डिओलॉजी विभागाच्या अतिरिक्त संचालक अपर्णा जसवाल यांनीही, कोरोनातून बरे झालेले तरूणांसह इतर 5-10 टक्के रुग्ण ह्रदयाशी संबंधित समस्या घेऊन रुग्णालयात परत येत असल्याचे म्हटले आहे.

जसवाल म्हणाल्या, ‘बरेच तरुण रुग्ण घाबरून पुन्हा रुग्णालयात परत येत आहे, याकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा यात हृदय गती कमी होण्यासारखी समस्या तर, हार्टफेल होण्याची शक्यता ही दिसून येत आहे.’

दिल्लीतील उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे हृदयरोग तज्ज्ञ संजीव गुप्ता म्हणाले, ‘कोरोना खरोखरच अघोषित समस्यांचे भांडार आहे. याशिवाय, तरुणांची जीवनशैली आणि खाण्यापिण्याची सवय देखील त्यांना या आजारांना बळी पाडत आहे.’

(After recovery from corona virus heart problem increased in patients)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.