Healthy foods | वय वर्ष 30 आहे आता… मग निरोगी राहण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश

आजारपण हे प्रौढ वयात जास्त दिसून यायचे पण आता तसं नाही राहीलं आहे. कमी वयात अनेकांना गंभीर आजारांनी ग्रासलं आहे. त्यामुळे आता वयाच्या तिशीमध्ये आल्यावर आहारात काही पदार्थांचा समावेश करा आणि आजारपणाला दूर ठेवा.

Healthy foods | वय वर्ष 30 आहे आता... मग निरोगी राहण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 3:07 PM

अनेक आजार आता कमी वयातही दिसून येत आहे. आपण अनेकांनी ऐकलं असेल त्या व्यक्तीचा हदयविकाराच्या झटक्याने जीव गेला आणि त्याचं वय होतं 30 वर्ष फक्त. बदलेल्या जीवनशैलीमुळे रोगांनी अनेकांना गाठलं आहे. कोरोना काळात तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, कमी वयाच्या अनेक लोकांना मधूमेह, बीपी, इतर असे गंभीर आजाराने वेढलं होतं. पण त्यांना त्याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे आता तरी जरा शहाणे व्हावा आणि तुमचं वय 30 असेल तर आहारात काही बदल करा आणि निरोगी राहा.

निरोगी राहण्यासाठी आहाराविषयी जागृत राहण्याची गरज आहे. पूर्वी लोकं कष्टाची काम करायची आणि आहारात पण पौष्टिक पदार्थांचा सेवन करायची. त्यामुळे आजारपण हे प्रौढ वयात जास्त दिसून यायचे पण आता तसं नाही राहीलं आहे. कमी वयात अनेकांना गंभीर आजारांनी ग्रासलं आहे. त्यामुळे आता वयाच्या तिशीमध्ये आल्यावर आहारात काही पदार्थांचा समावेश करा आणि आजारपणाला दूर ठेवा.

या पदार्थांचा करा समावेश

1. ब्रोकोली – रोजच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश नक्की करा कारण ब्रोकोलीमुळे हाड मजबूत होतात आणि सोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आहेत. 2. लसूण – लसूण हे शरीरातील सूक्ष्मजंतू मारण्यास रामबाण पदार्थ आहे. तर रोजच्या जेवणात लसणाचा वापर केल्यास आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 3. मध – मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियलने परीपूर्ण असं हे मध आरोग्याला उत्तम आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी, लिंबू आणि मध घेतल्यास याचा शरीराला खूप उपयोग होतो. 4. मासे (ऑईली फिश) – माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील आवश्यक हार्मोन्स तयार होण्यास याची मदत होते. तसंच फिश खाणे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. सॅल्मनसारखी तेलकट फिश शरीरासाठी जास्त असते म्हणून हिचा आहारात समावेश करा.

5. विटामिन सी – विटामिन सीयुक्त फळांचा रोज आहारात समावेश करा. यामुळे आपण हेल्दी राहता सोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 6. ड्राई फ्रूट्स – ड्राई फ्रूट्स रोज योग्य प्रमाणात खायला पाहिजे. यामुळे तुमचा शरीराला शक्ती मिळते. आणि जास्त जेवण तुमच्या पोटात जात नाही. आहार हा कायम संतुलिक आणि प्रमाणात असावा जास्त जेवल्यानेही शरीरावर त्याचा परिणाम होतो.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहात, आणि डायटिंग पण तरी होत नाही वजन कमी…मग हा उपाय करुन बघा…

Smart Home Tips | वीज बिलानं खिशाला भुर्दंड; टिप्स वापरा, वीज बिल घटवा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.