Research study by AIIMS : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेत आहात…तर, विशेष काळजी घ्या! अन्यथा मानसिक आरेाग्यावरही दुष्परिणाम

गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत जागरूकता वाढली आहे. जे एक चांगले लक्षण म्हणावे लागेल. सर्वांनीच मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे, विशेषतः: तुम्ही कोणत्याही मनोरुग्ण किंवा गंभीर आजाराने त्रस्त नातेवाईक, कुटुंबीयांच्या सेवेत गुंतले असाल, तर ही काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Research study by AIIMS : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेत आहात...तर, विशेष काळजी घ्या! अन्यथा मानसिक आरेाग्यावरही दुष्परिणाम
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 2:54 PM

प्रतिकूल परिस्थितीचा आपल्या मानसिक आरोग्यावर (on mental health) अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. मानसिक रुग्ण, दुर्धर आजारग्रस्थाच्या सेवेत असलेल्या व्यक्ती संबंधित अभ्यासात, AIIMS – All India Institute Of Medical Science पाटणा येथील डॉक्टरांना असे आढळून आले की, कर्करोग असलेल्या लोकांची काळजी घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका सर्वाधीक असतो. असे असताना देखील या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कालांतराने, ही समस्या गंभीर (The problem is serious) बनू शकते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता आणि तो ज्या रुग्णाची काळजी घेतो त्याची काळजी दोन्ही प्रभावित करते. तज्ञ म्हणतात की, जर तुम्ही दुर्धर आजाराशी (with terminal illness) लढत असणाऱया रुग्णाची काळजी घेत असाल तर, या काळात तुमच्या आरोग्याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नका. विशेषत: तुम्हाला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कॅन्सरग्रस्तांच्या केअर टेकरवर अभ्यास

रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, पाटणा एम्सच्या डॉक्टरांनी जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीत कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या केअर टेकरच्या जीवनाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी एक अभ्यास केला गेला. काळजी वाहकांमध्ये 350 स्पर्धकांचा समावेश होता. त्यापैकी 264 अभ्यासाच्या अंतिम विश्लेषणासाठी पात्र असल्याचे आढळले.

सहभागींच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी, संशोधकांनी त्यांच्या रुग्ण देखभालीच्या नित्यक्रमातील व्यत्यय, त्यांनी परिस्थिती किती सकारात्मकतेने हाताळली आणि या कालावधीत त्यांना आलेल्या आर्थिक अडचणींचा जवळून आढावा घेतला. जवळपास 31 प्रश्नांवर या अभ्यासक संशोधकांनी माहिती घेत विश्लेषण केले. संशोधनाच्या शेवटी, तज्ञांना आश्चर्यकारक गोष्टी समजल्या.

हे सुद्धा वाचा

अभ्यासात काय आढळले?

कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च कम्युनिकेशन्स या आंतरराष्ट्रीय पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की या काळात निम्म्याहून अधिक रुग्णाची देखभाल करणारे नातेवाईक,कुटुंबीय अशा केअर टेकरच्या मनःस्थितीवर विपरीत परिणाम झाला. डॉ. अमृता राकेश यांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात, कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या नी इतर अनेक प्रकारच्या समस्यांबद्दलही सांगितले. डॉ. अभिषेक शंकर, रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक म्हणतात, सहभागींपैकी 54 टक्के इतके अस्वस्थ होते की कर्करोगाच्या रुग्णांना ओझे वाटू लागले, तर 55 टक्के लोकांनी आर्थिक समस्या हे उपचारासाठी चिंतेचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले.

संशोधक काय म्हणतात?

सहभागींशी संवाद साधताना डॉ. अभिषेक सांगतात, यातील सुमारे ६२ टक्के लोकांना असे वाटले की, त्यांच्या दैनंदिन दिनश्चगर्येवर सर्व काळजीच्या व्यस्ततेमुळे नकारात्मक परिणाम होत आहे, तर ३८ टक्के लोकांनी सांगितले की, काळानुसार परिस्थिती बदलत आहे. या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. राकेश यांनी सांगितले की, कर्करुग्णांची काळजी घेणारे जीवनमान आणि मानसिक त्रास यांच्यात मजबूत संबंध आहे.

मनोचिकित्सक काय म्हणतात?

काळजीवाहू/रुग्णांच्या नातेवाईकांमधील वाढत्या मानसिक आरोग्य समस्या समजून घेण्यासाठी आम्ही मानसोपचार तज्ञांशी संपर्क साधला. इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेविअर अँड अलाईड सायन्सेस दिल्ली येथील मानसोपचार विभागाचे प्राध्यापक डॉ. ओमप्रकाश म्हणतात, हे खरे आहे की कर्करुग्णांची काळजी घेणाऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि जबाबदारीमुळे निर्माण होणाऱ्या तणावामुळे खराब मनःस्थिती आढळून आली. अशा लोकांना अनेकदा उदासीनता, चिंता, झोपेची समस्या आणि रुग्णाच्या जीवनात सुरू असलेल्या अशांततेमुळे चिडचिडे पणाची समस्या उद्भवते. अशा बाबींवर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.