वायू प्रदूषणामुळे वाढू शकतो हार्ट ॲटॅकचा धोका, असा करा बचाव
वायू प्रदूषण हे केवळ आपली फुप्फुसांसाठीच नव्हे तर हृदयासाठीही अतिशय धोकादायक ठरते.
नवी दिल्ली: सध्या ऋतू बदलाचे दिवस सुरू आहेत, हळूहळू थंडीचे (winter) आगमन सुरू होईल. वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला आहे. मात्र त्यासोबतच वायू प्रदूषणातही (air pollution) वाढ होऊ लागली आहे. वातावरणातील गारवा जसा वाढू लागतो त्यासोबतच फॉग (धुकं) आणि स्मोक (धूर) दोन्ही वाढू लागतो, ज्याला आपण सर्वजण स्मॉग (smog) या नावाने ओळखतो.
हे स्मॉग आपल्या शरीरासाठी तसेच आरोगयासाठी अतिशय हानिकारक असते. स्मॉग हे आपल्या फुप्फुसांच्या अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरते. मात्र हे स्मॉग अथवा वायू प्रदूषण केवळ आपली फुप्फुसांसाठीच नव्हे तर हृदयासाठीही अतिशय धोकादायक ठरते, हे तुम्हाला माहीत आहे का ? स्मॉग आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अनेक धोके निर्माण करू शकते.
वायू प्रदूषण हृदयासाठी हानिकारक
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ वायू प्रदूषणाचा सामना केल्याने हार्ट ॲटॅक अथवा हृदयासंबंधित इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जेव्हा आपण खराब गुणवत्तेच्या हवामानात अथवा हवेमध्ये, श्वासोच्छ्वास करतो, तेव्हा हवेत असणारी प्रदूषक तत्वं आपली फुप्फुसे आणि हृदयापर्यंत रक्तप्रवाहात खोलपर्यंत जाऊ शकतात. ज्यामुळे आपल्याला हृदयासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
असा पडतो प्रभाव
जेव्हा हवेत असलेली प्रदूषक तत्वे आपल्या शरीरात जातात, तेव्हा रक्ताचे स्वतंत्रपणे वहन होणे अधिक कठीण बनते. या कारणामुळे ब्लड क्लॉ्टस (रक्ताच्या गुठळ्या) तयार होण्याची शक्यता अधिक असते.
आपले ब्लड प्रेशर वाढू लागते, कारण शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त वाहून नेण्यासाठी हृदय पंप होण्याचा वेग वाढतो. यामुळे हार्ट फेलही होऊ शकते. इतकेच नव्हे तर ज्या लोकांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनाही हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट ॲटॅकही येऊ शकतो.
असा करा वायू प्रदूषणापासून बचाव
वायू प्रदूषणापासून होणारे नुकसान टाळायचे असेल किंवा त्यापासून बचाव करायचा असेल तर संतुलित आहार घेणे हा उत्तम उपाय ठरतो. संतुलित तसेच चौरस आहारामध्ये आवश्यक ती व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वे ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
ते आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याशिवाय तुम्ही जीवनशैलीत नियमित व्यायामाचाही समावेश केला पाहिजे.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )