Alcohol side effects : अति दारू पिणे (Drinking alcohol) हे आरोग्यसाठी (Health) हानिकारक मानले जाते. दारूचा परिणाम हा तुमच्या हृदय (Heart) तसेच फुफ्फसावर देखील होतो. तुम्ही जर नियमित दारू पित असाल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका अधिक असतो. तसेच तुमच्या किडन्या देखील अति मद्यपानामुळे खराब होऊ शकतात. एवढेच नाही तर दररोज दारू पिल्याने त्याचा परिणाम हा तुमच्या त्वचेवर देखील होतो. त्वचा अधिक कोरडी निस्तेज आणि सैल होते. तज्ज्ञांच्या मते जे लोक नियमीत दारू पितात त्यांनी पाणी अधिक प्रमाणात प्यावे. पाणी जास्त न पिल्यास तुमची त्वचा हळूहळू कोरडी होऊ लागते. त्वचा कोरडी झाल्यामुळे तुमच्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात. नियमित दारू पिल्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स देखील येतात. तसेच त्वचा जास्त काळ कोरडी राहिल्याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडून तुम्हाला अकाली वृद्धत्व येते. अति दारू पिण्याचा नेमका काय परिणाम होतो त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
नियमीत दारू पिल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होऊ लागते आणि त्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अकाली सुरकुत्या दिसू लागल्याने माणूस तरुण वयातच म्हातारा दिसू लागतो.
दारूच्या अति सेवनामुळे शरीरात विषारी पदार्थांची संख्या वाढू लागते आणि त्यामुळे त्वचेवर पिंपल्सही दिसू लागतात. दारूच्या
सेवनाने शरीरात आवश्यक त्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. जर तुम्हाला त्वचा निरोगी ठेवायची असेल, तर दारू पिणे टाळा.
अशी अनेक पेये आहेत, जी त्वचेसाठी ऍलर्जीचे कारण बनतात. या ऍलर्जीमुळे लालसरपणा आणि खाज सुटते. अशी हानिकारक पेय पिणे आपल्याला चांगले वाटते, परंतु त्यांच्यामुळे शरीराची आतोनात हाणी होते.
असे म्हटले जाते की दारूच्या अतिसेवनामुळे त्वचेची मोठ्याप्रमाणात हानी होते. ज्यामध्ये त्वच्या सैल होणे, त्वचा कोरडी होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. त्वचा दीर्घकाळ कोरडी राहिल्यास ती आपोआप सैल होऊ लागते. त्यामुळे तज्ज्ञांकडून दारूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
Fashion Tips : गरोदर असतानाही दिसा फँशनेबल, जाणून घ्या काही टिप्स
बहुगुणी कडूलिंब त्वचेपासून ते केसांच्या समस्येवर उपयुक्त…जाणून घ्या कडूनिंबाची महती
सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा