Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यनामा | आला हिवाळा, मुलांना सांभाळा; फुप्फुसांच्या जीवघेण्या संसर्गापासून मुलांचं रक्षण करा

न्यूमोनिया हा श्वसनाचा विकार आहे. न्यूमोनियाच्या तीव्र संसर्गामुळे फुप्फुसांना बाधा पोहोचते. विषाणूंच्या संसर्गामुळे फुप्फुसाला सूज सुद्धा येते. मानवी शरीरातील फुप्फुससात द्रव पदार्थाचा संचय झाल्याने विकाराची तीव्रता अधिक वाढते. थेट परिणाम शरीरातील जीवनवायूच्या वहनावर होतो.

आरोग्यनामा | आला हिवाळा, मुलांना सांभाळा; फुप्फुसांच्या जीवघेण्या संसर्गापासून मुलांचं रक्षण करा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:12 PM

मुंबई : हिवाळ्यातील बदलत्या वातावरणाचा फटका बालकांना बसतो. ताप, सर्दीची लक्षणे बालकांना जाणवू लागतात. मात्र, सुरुवातीला होणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. मुले न्यूमोनियाच्या विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता अधिक बळावते. वेळेपूर्वीच दक्षता बाळगल्यास न्यूमोनियाला प्राथमिक टप्प्यावरच प्रतिबंध करता येऊ शकतो. (Analyze the symptoms observed in Children during winter)

न्यूमोनिया हा श्वसनाचा विकार आहे. न्यूमोनियाच्या तीव्र संसर्गामुळे फुप्फुसांना बाधा पोहोचते. विषाणूंच्या संसर्गामुळे फुप्फुसाला सूज सुद्धा येते. मानवी शरीरातील फुप्फुसात द्रव पदार्थाचा संचय झाल्याने विकाराची तीव्रता अधिक वाढते. थेट परिणाम शरीरातील जीवनवायूच्या वहनावर होतो.

न्यूमोनियाची लक्षणे

मणिपाल रुग्णालयाचे सल्लागार व प्रसिद्ध फुप्फुसतज्ज्ञ डॉ. शिवराज यांनी लक्षणांविषयीची माहिती दिली आहे. प्राथमिक स्वरुपात न्यूमोनियाची लक्षणे मुलांमध्ये दिसून येत नाहीत. वैद्यकीय चाचण्यांना सामोरे गेल्याविना लक्षणे स्पष्ट होत नाही. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर काही वैद्यकीय चाचण्यांच्या आधारावर न्यूमोनियाचे स्तर स्पष्ट होतात.

न्यूमोनियाच्या चाचण्या

न्यूमोनियाची तीव्रता जाणून घेण्यासाठी छातीचा एक्स-रे काढला जातो. त्यासोबतच मानवी रक्ताचे परिक्षणही केले जाते. ज्याद्वारे मानवी शरीरातील ऑक्सिजन व कार्बन-डायऑक्साईड यांचे प्रमाण दिसून येते. फुप्फुसांच्या निरोगीपणाचे मापन करण्यासाठी स्पटम कल्चर (संसर्गाची चाचणी), पल्स ऑक्सिमेट्री (रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण), छातीचा सीटी स्कॅन अशा चाचण्या केल्या जातात.

न्यूमोनियाचे स्तर

न्यूमोनिया संसर्गाचे विविध स्तर आहेत. प्रत्येक स्तरानुसार न्यूमोनिया विकाराची तीव्रता जाणवते.

स्तर पहिला

संसर्ग होण्यापूर्वीच्या 24 तासांच्या कालावधी यामध्ये समाविष्ट असतो. विषाणूंचा फुप्फुसात प्रवेश या स्तरावर होतो. विषाणूंशी रक्तातील पांढऱ्या पेशी सामना करतात. अधिक रक्ताच्या मागणीमुळे व पेशींना येणाऱ्या सुजीमुळे फुप्फुसांना लाल रंग प्राप्त होतो.

स्तर दुसरा

संसर्गाच्या 48 ते 72 तासांचा कालावधीचा यामध्ये समावेश होतो. ही अवस्था 2 ते 8 दिवसांपर्यंत राहते. या अवस्थेत फुप्फुसाला शुष्कता प्राप्त होते.

स्तर तिसरा

संसर्गाची सर्वाधिक तीव्रता तिसऱ्या स्तरात दिसून येते. फुप्फुसांचा रंग लाल किंवा जांभळा होतो. शरीरातील लाल रक्त पेशींचे मोठ्या प्रमाणात विघटन होते.

न्यूमोनियाची लक्षणे

रुग्णांना सर्दी, ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे जाणवतात. तसेच फुप्फुसांचा दाह देखील काही रुग्णांमध्ये दिसून येतो.

इतर बातम्या

Omicron : मराठवाडा, विदर्भात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला, उस्मानाबाद, बुलडाण्यात नवे रुग्ण

Foot Pain | तुमचेही पाय दुखतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

एनर्जी बूस्टर: प्रतिकारशक्ती ते ऊर्जा निर्मिती; जाणून घ्या- लाल केळीचे फायदे

(Analyze the symptoms observed in Children during winter)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.