Monkey pox: मंकीपॉक्सच्या लक्षणांच्या उपचारांसाठी अँटीव्हायरल Tecovirimat प्रभावी, संशोधनातून खुलासा

कोव्हिडचे संकट आतात कुठे कमी होत असतानाच भारतासह जगभरात सध्या मंकीपॉक्सने कहर माजवला आहे. जगभरातील मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Monkey pox: मंकीपॉक्सच्या लक्षणांच्या उपचारांसाठी अँटीव्हायरल Tecovirimat प्रभावी, संशोधनातून खुलासा
जगात पहिल्यांदाच एकाच माणसाला तीन आजारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 11:07 AM

सध्या भारतासह जगभरात मंकीपॉक्सने कहर माजवला आहे. कोरोना (Corona) महामारीनंतर मंकीपॉक्सच्या (Monkeypox) वाढत्या रुग्णांमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. या संदर्भात वेळोवेळी आरोग्य विषयक सूचना जारी केल्या जात आहेत. अनक रुग्णांचे निरीक्षण केले जात आहे आणि चाचण्याही सुरुच आहेत. त्याचबरोबर या आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक खबरदारीही घेत आहेत. दरम्यान युसी डेव्हिस हेल्थ स्टडीनुसार, मंकीपॉक्सची लक्षणे आणि त्वचेवरील घावांवर उपचार करण्यासाठी टेकोव्हिरिमॅट (Tecovirimat) हे औषध सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. मंकीपॉक्स असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टेकोव्हिरिमॅट या ॲंटीव्हायरल औषधाचा वापर करण्याचे परिणाम काय होतात, याची नोंद घेण्यासाठी सुरू असलेले हे संशोधन सुरूवातीच्या टप्प्यात आहे.

टेकोव्हिरिमॅट (TPOXX) हे अन्न व औषध प्रशासनाने (FDA- Food and Drugs Administration) मंजूरी दिलेले औषध आहे. हे विषाणूमध्ये असलेले प्रोटीन संपवून त्यायचा शरीरात प्रसार होण्यापासून रोखते. डेव्हिसचे प्रमुख लेखक एंजल देसाई यांनी सांगितले की, आमच्याकडे मंकीपॉक्सच्या संसर्गावर टेकोव्हिरिमॅटच्या वापराबद्दल मर्यादित माहिती आहे, परंतु या रोगाच्या नैसर्गिक प्रगतीबद्दल बरेच काही शिकण्यासारखे आहे.

25 रुग्णांवर करण्यात आले परीक्षण –

या संशोधना दरम्यान मंकीपॉक्स झालेल्या 25 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना टेकोव्हिरिमॅट थेरपी देण्यात आली होती. या रोग्यांच्या शरीरावरील अनेक भागांत तसेच चेहरा आणि जननेंद्रियावर अनेक घाव होते. त्या रुग्णांच्या वजनाच्या आधारावर त्यांना ही थेरपी 8 ते 12 तासांनंतर देण्यात येत होती.

21 व्या दिवशी रुग्ण पूर्णपणे झाले बरे –

या संधोधनातील माहितीनुसार, उपचार सुरू असताना 7 व्या दिवशी 40 टक्के रुग्णांचे घाव बरे झाले होते. तर उपचारांच्या 21 व्या दिवसापर्यंत 92 टक्के रुग्ण बरे झाले. या परीक्षणासाठी ज्या व्यक्तींची निवड करण्यात आली होती त्यामध्य सर्वजण पुरूष होते व त्यांचा वयोगट 27 ते 76 या दरम्यान होता. त्याव्यतिरिक्त 9 रुग्णांना एचआयव्ही झाला होता.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.