कोव्हिड 19 मधून रिकव्हर झालायेत?, आधी तुमचा ब्रश बदला; पुन्हा कोरोना संक्रमणापासून दूर रहा
कोरोनातून रिकव्हर होताना सर्वात पहिले तुमची एक सवय बदला. नाहीतर पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो. तज्ज्ञ अंजना सत्यजीत यांच्यानुसार प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी आपला टुथब्रश बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
संपूर्ण जगात ओमिक्रॉनने (Omicron) कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) आणली आहे. अर्थात ही तिसरी लाट जीवघेणी ठरली नसली तरी यावेळी संक्रमण मात्र खूप वाढले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तिसऱ्या लाटेने लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही संक्रमित केले आहे. अशावेळी जर तुम्ही कोरोनाबाधित असाल किंवा कोरोना होऊन गेल्यावर रिकव्हर होत असाल तर तोंडाच्या स्वच्छतेकडे (Oral hygiene) लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे का जर या काळात तुम्ही तुमचा टुथब्रश नाही बदलला तर तुम्हाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः एकत्र कुटुंब असणाऱ्या किंवा एकच बाथरूम शेअर करणाऱ्या व्यक्तींवर करोनाचे संकट पुन्हा ओढवू शकते.
काय म्हणाल्या डॉ. अंजना सत्यजीत?
गुरूग्रामच्या आर्टेमिस हॉस्पिटलच्या डेंन्टिस्ट डॉ. अंजना सत्यजीत यांनी टुथब्रश तातडीने बदला. अन्यथा कोरोना पुन्हा उद्भवू शकतो असा इशारा दिला आहे. कोव्हिड-19 होऊन गेला आणि तुम्ही त्यातून बरे होत असाल तर सर्वात अगोदर तुमचा टुथब्रश बदला असे त्यांनी सांगितले. डॉ. अंजना यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीने एरवी सुद्धा दर तीन महिन्यांनी आपला टुथब्रश बदलायला हवा. त्यात तुम्ही करोनाबाधित किंवा तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे तर तुम्ही अगोदर ब्रश बदला असा सल्ला त्यांनी दिला. कारण प्लास्टिकच्या तळाशी व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहतो. त्यामुळे अगोदर ब्रश बदला. कोरोनाच्या संक्रमणापासून पुन्हा वाचायचे असेल तर ब्रश बदला. त्यातच तुमच्या कुटुंबातील सगळे जण एकच बाथरूम शेअर करत असतील तर त्यांची सुरक्षा म्हणूनही टुथब्रश नक्की बदलायला हवा असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच नुसता ब्रश बदलून जमणार नाही तर संक्रमण रोखण्यासाठी नवा टंग क्लीनर वापरा. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. सोबतच तोंडाच्या स्वच्छेतेवर देखील याचा परिणाम होतो. यातून तोंड सुकणे किंवा तोंड येणे अशा समस्या उद्भवू शकतात. असेही यावेळी डॉ. अंजना सत्यजीत म्हणाल्या आहेत.
काय आहे यामागचे विज्ञान
तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण व्हायरसचा प्रसार हा तोंडावाटे सर्वाधिक होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना व्हायरस हा करोनाबाधित व्यक्तीच्या तोंडावाटे पसारतो. विशेषतः बाधितांच्या थुंकीतून बाहेर येणारे छोटे-छोटे तुषार सुद्धा व्हायरस पसरवतात. या व्यक्तींना जेव्हा शिंक येते, ती खोकतात किंवा बोलतात किंवा हसतात. त्यातूनही व्हायरस पसरू शकतो. याशिवाय व्हायरस तळभागावर जसे हातावर राहू शकतो. व्हायरस अधिक त्रासदायक होण्यापेक्षा हात नियमित धुवा आणि स्वच्छ करा. जर तुम्ही बाहेर काम करत असाल तळ आपला हात वाऱंवार धुवत चला.
कशी घ्याल तोंडाच्या स्वच्छतेची काळजी ?
दात घासण्यापूर्वी आणि फ्लासिंग करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. दिवसातून दोनवेळा ब्रश करा, फ्लॉस करा आणि आपली जीभ स्वच्छ ठेवा. माऊथवॉशचा वापर नियमित करा. जर तुमचे बाथरूम एकच असेल तर बेसिनचे सिंक नियमित निर्जंतुकीकरण करा.
संबंधित बातम्या
तुमच्या मुलीला दिली का ‘ही’ लस? लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा
Fitness tips: कोरोनात जिम बंद? टेन्शन नको, घरीच हे व्यायम करा आणि वजन घटवा