Diet Plan : वयाच्या 55 व्या वर्षी ब्रिटनच्या माजी खासदाराने 50 किलो वजन केले कमी; ‘वेटलॉस’करिता या खास ‘डाएट प्लॅन’सह व्यायामाचा अवलंब
Weight Loss : ब्रिटनचे माजी खासदाराने वयाच्या 55 व्या वर्षी तब्बल 50 किलोने वजन कमी केले आहे. त्यांचा वजन कमी करण्याचा एकूणच प्रवास कसा होता, वजन कसे वाढले, वजन कमी करण्याचे रहस्य काय होते? याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
सद्यस्थितीत प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा आहे. त्यामुळे जगातील अनेक लोक आपले वजन कमी (Weight loss) करण्यात व्यस्त झाले आहेत. नोकरदार लोकांना वजन कमी करणे आणखी कठीण वाटते. कारण त्यांचा बहुतांश वेळ ऑफिसच्या कामात जातो. काही काळापूर्वी ब्रिटनचे माजी खासदार टॉम वॉटसन यांनीही आपले वजन कमी केले आहे. टॉम हे मजदूर पक्षाचे उपनेते, डिजिटल, कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट शॅडो सेक्रेटरी, पश्चिम ब्रॉमविच ईस्टचे खासदार होते. वर्ष-2019 मध्ये त्यांनी राजकारण (Politics) सोडले. टॉम यांनी वयाच्या 55 व्या वर्षी जवळपास 50 किलो वजन कमी केले आहे. त्यांनी आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासावर ‘टॉम वॉटसन डाउनसाइझिंग’ (Tom Watson Downsizing) नावाचे पुस्तकही लिहिले आहे. टॉमने त्यांचे वजन कसे कमी केले आणि त्याचा डाएट-वर्कआउट प्लॅन काय होता? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.
टॉम दुप्पट खायचे
टॉम वॉटसन सध्या बेवडली, वूस्टरशायर येथे राहतात. सध्या टॉम 55 वर्षांचे आहेत. टॉमने द मिररला सांगितले की, वर्ष-2017 मध्ये, जेव्हा माझी मुलं मलाची आणि सॉइर्से 12 आणि नऊ वर्षांची होती, तेव्हा मला समजले की, आपण वजन कमी केले नाही तर लवकरच जगाचा निरोप घ्यावा लागेल. मला माझ्या मुलांसाठी जगायचे होते. टॉम पुढे म्हणतात, मी दिवसभर खायचो. जर आपण माझ्या दुपारच्या जेवणाबद्दल बोललो, तर मी दुपारच्या जेवणात जेवढ्या कॅलरीज आवश्यक आहेत, त्यापेक्षा दुप्पट खात होतो. माझे वजन वाढण्याचे कारण म्हणजे मी रात्री उशिरा चॉकलेट, मसालेदार करी, जंक फूड खात असे. हळूहळू माझे वजन वाढत गेले आणि मला टाइप-2 मधुमेहाचे निदान झाले. पण, माझे वजन सुमारे 50 किलो कमी झाले, त्यामुळे आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि मधुमेहाचे औषधही घेत नाही.
आणि निश्चय पूर्ण केला
टॉम म्हणतात, “मी आधी माझे 100 पौंड वजन कमी करण्याचे ध्येय ठेवले होते आणि त्यानंतरच फिटनेसचा प्रवास सुरू केला. हा प्रवास सुरू करण्याच्या पहिल्याच दिवशी मी एक पौंड आणि पहिल्या आठवड्यात सुमारे अडीच किलो वजन कमी केले होते. त्यानंतर मला खूप समाधान वाटले आणि मी, ठरवले की मी, 100 पौंड कमी करेन. आज माझे वजन 88 किलो पेक्षा कमी आहे.”
टॉम जेवणात या गोष्टी टाळतात
टॉम वॉटसनला मिठाई आवडते पण, आता ते साखर अजिबात खात नाहीत. पूर्वी ते रोज जेवणासोबत बिअर प्यायचे, पण आता अजिबात घेत नाही. ते, सकाळच्या नाश्त्यात ऑम्लेटसोबत पालक आणि कॉफी घेतात. दुपारच्या जेवणात माशासोबत सॅलड. अन्नामध्ये कोणतेही प्रक्रिया केलेले अन्न घेत नाही. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न खाल्लेले नाही. ते बाहेर गेले तरी, लिंबू घालून वोडका किंवा सोडा पितात. याशिवाय रात्री कोबीसोबत भात खातात.
रोज 10 हजार पावलांचा व्यायाम
टॉम व्यायामाला खूप महत्त्व देतात. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, ते रोज किमान 10 हजार पावले चालतात. ते म्हणाले की, “मी टप्प्या-टप्प्यांमध्ये चालायचो. याशिवाय मी आठवड्यातून तीन दिवस जिममध्ये जायचो. तिथे मी वेट लिफ्टिंग, सर्किट ट्रेनिंग करायचो. या सर्व गोष्टींमुळे मला वजन कमी होण्यास मदत झाली. मी दर आठवड्याला वजन तपासतो. मी, शरीरावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने मला स्वतःला फिट होण्यास खूप मदत झाली आहे.