Corona Updates| कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औरंगाबादेत 46 बळी, मागील आठ दिवसात 20 रुग्णांचा मृत्यू!
25 जानेवारीला एकही रुग्ण दगावला नाही. मात्र 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसात 20 रुग्ण दगावले. यात 28 जानेवारी आणि 31 जानेवारी या दोन्ही दिवशी प्रत्येकी पाच रुग्णांचा बळी गेल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
औरंगाबाद: पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक (Corona third wave) दिसून येत असला तरीही कोरोना आजाराच्या लक्षणांत तीव्रतेचे प्रमाण कमी होते. असे असले तरीही औरंगाबादमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची (Aurangabad corona death) संख्याही लक्षणीय आहे. गेल्या महिनाभरात तिसऱ्या लाटेने जिल्ह्यातील तब्बल 46 रुग्णांचा बळी घेतला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील 20 जणांचा मृत्यू मागील आठ दिवसात झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात (Aurangabad district) कोरोनामुळे फक्त 12 जणांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेतील रुग्ण संख्येमुळे दहशत निर्माण झाली आहे. त्यातही जानेवारी महिन्याच्या 29 दिवसातच तब्बल 36 मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.
जानेवारीपासून मृत्यूचे सत्र सुरु
तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा वेग अफाट आहे. त्यामुळे शहरातील अनेक वसाहती बाधित झाल्या. दररोज शेकडो नव्या रुग्णांची भर पडत आहे. जानेवारी महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या 66 वरून 8 हजारांच्या घरात पोहोचली. मात्र नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाणही अत्यल्प आहेत. मात्र असे असूनही उपचारादरम्यान मृत्यू पावणारी संख्या लक्षणीय आहे. 19 जानेवारीपासून मृत्यूचे हे सत्र सुरु आहे. सलग सहा दिवसात 15 जणांचा बळी गेला आहे. 25 जानेवारीला एकही रुग्ण दगावला नाही. मात्र 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसात 20 रुग्ण दगावले. यात 28 जानेवारी आणि 31 जानेवारी या दोन्ही दिवशी प्रत्येकी पाच रुग्णांचा बळी गेल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
डिसेंबरच्या तुलनेत तिप्पट मृत्यू
मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनामुळे फक्त 12 जणांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेतील रुग्ण संख्येमुळे दहशत निर्माण झाली आहे. त्यातही जानेवारी महिन्याच्या 29 दिवसातच तब्बल 36 मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.
इतर बातम्या-